मराठी बातम्या /बातम्या /Viral /दहावीच्या रिझल्टनंतर शाळेत राडा; विद्यार्थिनी आणि कर्मचाऱ्यांमधील मारहाणीचा धक्कादायक VIDEO

दहावीच्या रिझल्टनंतर शाळेत राडा; विद्यार्थिनी आणि कर्मचाऱ्यांमधील मारहाणीचा धक्कादायक VIDEO

या व्हिडीओमध्ये शाळेतील कर्मचारी विद्यार्थिनी आणि तिच्या कुटुंबासोबत मारहाण करीत असल्याचं दिसून येत आहे. दहावीच्या रिझल्टवरुन हा वाद सुरू झाला होता.

या व्हिडीओमध्ये शाळेतील कर्मचारी विद्यार्थिनी आणि तिच्या कुटुंबासोबत मारहाण करीत असल्याचं दिसून येत आहे. दहावीच्या रिझल्टवरुन हा वाद सुरू झाला होता.

या व्हिडीओमध्ये शाळेतील कर्मचारी विद्यार्थिनी आणि तिच्या कुटुंबासोबत मारहाण करीत असल्याचं दिसून येत आहे. दहावीच्या रिझल्टवरुन हा वाद सुरू झाला होता.

जबलपुर, 17 जुलै : शिक्षेच्या (School) मंदिरात शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांसोबत स्नेह, अनुशासन आणि प्रोत्साहनाचं नातं ठेवावं लागतं. मात्र जबलपूरमील बिलहरी येथील अयप्पा हायर सेकेंडकी शाळेतून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ (Shocking VIDEO) अत्यंत लज्जास्पद आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ दहावीच्या वर्गातील विद्यार्थिनीचा आहे.

या व्हिडीओमध्ये शाळेतील कर्मचारी विद्यार्थिनी आणि तिच्या कुटुंबासोबत मारहाण करीत असल्याचं दिसून येत आहे. रागाच्या भरात विद्यार्थी आणि त्याचे नातेवाईकही आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. मुळात निकालावरुन झालेल्या छोट्याशा वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. (students and staff at the school after the result of class X )

15 वर्षीय विद्यार्थिनी आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी TC घेण्यासाठी शाळेत गेली होती. दहावी बोर्डाचे निकाल हे इंटरनर एसेसमेंटच्या आधारावर जारी करण्यात आले आहेत. विद्यार्थिनीने आपले जुने ट्रॅक रेकॉर्ड चांगलं असल्याचं सांगून शाळेच्या मॅनेजरला याबाबच विचारलं, की तिला इतके कमी मार्क कसे मिळाले?

हे ही वाचा-Exclusive : लग्नमंडपातील गोळीबारात नववधूला लागली गोळी; सुन्न करणारा LIVE VIDEO

" isDesktop="true" id="580769" >

विद्यार्थिनीने असा सवाल केल्यानंतर शाळेचे कर्मचारी आणि विद्यार्थिनीमध्ये वाद झाला. हा वाद मारहाणीपर्यंत गेला. त्यावेळी विद्यार्थिनीचे कुटुंबीयही आक्रमक झाले. यानंतर विद्यार्थिनी आपली आई व बहिणींना घेऊन पोलीस स्टेशनला गेली. येथे पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: 10th class, Exam result, School