जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चिकन आवडले नाही म्हणून व्यक्तीनं केलं असं कृत्य, अखेर आली पश्चातापाची वेळ, पाहा VIDEO

चिकन आवडले नाही म्हणून व्यक्तीनं केलं असं कृत्य, अखेर आली पश्चातापाची वेळ, पाहा VIDEO

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

खराब चिकन बिर्याणीची ऑर्डर मिळाल्यानंतर एका व्यक्तीने विचित्र काम केलं आहे. ज्याबद्दल जाणून तुम्हाला देखील वाटेल आश्चर्य

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 19 ऑक्टोबर : सोशल मीडियावर आपल्याला असे काही व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपल्याला आश्चर्यचकीत करतात. सध्या एक असाच व्हिडीओ पाहायला मिळत आहे. जो पाहून आधी तुम्हाला धक्का बसेल. परंतू यामागटचं कारण तुम्हाला माहित पडेल तेव्हा मात्र तुम्हाला त्यावर हसावं की दुख व्यक्त करावं हे कळत नव्हतं. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. न्यूयॉर्क पोस्टनुसार, खराब चिकन बिर्याणीची ऑर्डर मिळाल्यानंतर एका व्यक्तीने येथील बांगलादेशी रेस्टॉरंटला आग लावली. असं सांगितलं जात आहे की, त्या व्यक्तीला तेथील चिकन आवडलं नाही, ज्यामुळे त्याने असा निर्णय घेतला. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की एक व्यक्ती एका दुकाना बाहेर बऱ्याच काळापासून उभी असते. ती व्यक्ती आजूबाजूला पाहाते आणि मग जवळील पेट्रोल दुकानाजवळ टाकते आणि माचिसच्या काडीने दुकानाला आग लावले. जे फारच भयानक आहे. हे ही वाचा : स्विगी डिलिवरी बॉयने ट्राफिक पोलीस बनुन केलं असं काम, आता VIDEO ठरतोय चर्चेचा विषय खरंतर हे सगळं करताना त्या व्यक्तीचा देखील आगीशी संबंध येतो, ज्यामुळे त्याच्या अंगाला देखील आग लागल्याचे तुम्ही पाहू शकता. क्वीन्स परिसरात ही घटना घडली. माहितीनंतर पोलिसांनी आरोपी चोफेल नोरबू (वय ४९ वर्ष) याला अटक केली. आरोपीने जॅक्सन हाइट्स येथील इट्टाडी गार्डनला आग लावल्याची कबुली दिली आहे. चांगली चिकन बिर्याणी न मिळाल्याचा राग होता

जाहिरात

रिपोर्टनुसार, एक दिवस आधी आरोपी चोफेल नोरबूने क्वीन्स भागात असलेल्या बांगलादेशी रेस्टॉरंटमध्ये चिकन बिर्याणीची ऑर्डर दिली होती. पण रेस्टॉरेंट कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा करत त्यांना निकृष्ट माल दिल्याचा आरोप केला आहे. यामुळे नोर्बूला खूप राग आला आणि काही तासांनंतर तो रात्री पुन्हा त्या रेस्टॉरंटमध्ये गेला. तेथे तो काही वेळ बाहेर उभा राहिला आणि संधी मिळताच ते दुकान पेटवून दिलं. अटक केलेल्या नोरबूने पोलिसांना सांगितले की, ‘मी खूप नशेत होतो, मी चिकन बिर्याणी विकत घेतली होती. त्यांनी मला चांगली चिकन बिर्याणी दिली नाही. मी वेडा झालो आणि त्यामुळे मी असा निर्णय घेतला.’ सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दिसत आहे

News18लोकमत
News18लोकमत

घटनेचे वर्णन करताना आरोपीने पोलिसांना सांगितले की, ‘मी आधी तेलाचा कॅन घेतला आणि नंतर तो दुकानात फेकून दिला आणि नंतर आग लावली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. न्यूयॉर्क अग्निशमन विभागाने त्याचा एक व्हिडीओही जारी केला आहे. ज्यानंतर आरोपीची ओळख पटवून त्याला पकडण्यात आलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्हाला दिसेल की आग लावल्यानंतर तो काही वेळ तिथे उभा होता. ज्यानंतर एक मोठा स्फोट झाला आणि त्यामुळे त्याच्या अंगाला देखील आग लागली. नशीबाने ही आग थांबली नाहीतर खूप मोठा अनर्थ झाला असता, कारण तो रेस्टॉरेंट एका बिल्डिंग खाली आहे. त्यामुळे लोकांच्या घरांना देखील आग लागली असती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात