मुंबई 10 ऑक्टोबर : सोशल मीडिया एकदा का तुम्ही ओपन केला की, तुमच्या समोर नेहमीच कोणते ना कोणते व्हिडीओ समोर येत असतात. जे मजेदार, तर कधी धक्कादायक असतात. सध्या एक असाच व्हिडीओ समोर आला आहे, ज्यावरती विश्वास ठेवणे फारच कठीण आहे. हो कारण या व्हिडीओमध्ये जे घडतंय, ते आपल्या विचार शक्तीच्या पलिकडचं आहे. आपल्याला हे तर माहितच आहे की, वाघ असोत किंवा सिंह हे दोघेही खूपच धोकादायक शिकारी आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर जाण्यापासून कोणीही घाबरतं. त्यांच्या ताकदीपुढे आणि त्यांच्या चपळते पुढे सगळेच फेल आहेत. असं असताना ही एका कुत्र्यानं भलतीच हिंमत केली आहे. खरंतर या कुत्र्यानं वाघ आणि सिंहा समोर जाण्याची हिंमत केली. एवढं नाही तर या कुत्र्यानं चक्कं वाघाचा कानच चावला… हे ही पाहा : हा Video थरकाप उडावणारा! कोणत्याही सेफ्टी शिवाय 23व्या मजल्याच्या छतावरुन Stunt करु लागला व्यक्ती तुम्हाला विश्वास बसत नसेला तरी देखील हे खरं आहे. आता हे ऐकून तुमची उत्सुक्ता वाढली असेलच. चला तर मग पहिला हा व्हिडीओ पाहू. ह व्हिडीओ animals_powers नावाच्या अकाउंटवरुन इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. जो पाहून अनेक लोक आश्चर्यचकीत झाले आहेत.
बापरे! रस्त्यावर आलेल्या वाघासोबत सेल्फी घ्यायला गेले तरुण आणि…; काय झाला शेवट पाहा VIDEO जिथे वाघासमोर जायला, लोक घाबरतात. पण या कुत्र्यानं कशाचाही विचार न करता सरळ वाघाच्या कानाचा चावा घेतला. वाघाने आपल्या पंजाने कुत्र्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याचा काहीही फायदा झाला नाही. कुत्रा काहीही केल्या वाघाचं कान सोडायला तयार नव्हता. या व्हिडीओला सोशल मीडियावर लोकांनी खूपच पसंत केलं आहे आणि त्याला लाईक आणि शेअर देखील केलं आहे.