जाहिरात
मराठी बातम्या / Viral / खात्यात अचानक 470 रुपये, महिलेनं बँकेत तक्रार करताच... नक्की काय घडलं?

खात्यात अचानक 470 रुपये, महिलेनं बँकेत तक्रार करताच... नक्की काय घडलं?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

सुरुवातीला महिलेचा विश्वास बसला नाही, पण त्यानंतर तिने नीट तपासणी केली असता प्रत्यक्षात 470 कोटी रुपये तिच्या खात्यात पोहोचल्याचे समोर आले, पण कहाणी पुढे बदलली

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 23 डिसेंबर : बऱ्याचदा बँक काही टेक्निकल ग्लिचमुळे चुकिच्या खात्यात पैसे टाकते किंवा कट करते. ज्यामुळे कधीकधी ग्राहकांना याचा चांगला-वाईट फटका बसतो. यासंबंधीत अनेक प्रकार घडल्याचे तुम्ही ऐकले असेल. सध्या असंच एक विचित्र प्रकार समोर आला आहे. जो ऐकून तुम्हाला धक्का बसेल. खरंतर एका महिलेच्या खात्यात चुकून 470 कोटी रुपये आले. ज्यामुळे या महिलेला आश्चर्य वाटले. सुरुवातीला महिलेचा विश्वास बसला नाही, पण त्यानंतर तिने नीट तपासणी केली असता प्रत्यक्षात 470 कोटी रुपये तिच्या खात्यात पोहोचल्याचे समोर आले. हे ही पाहा : स्टाईल करणं महिलेला महागात पडलं, केसांची अशी अवस्था की… एकदा हा व्हिडीओ पाहा वास्तविक, ही घटना अमेरिकेतील टेक्सासमधील आहे. बँकेच्या चुकीमुळे एवढी मोठी रक्कम महिलेच्या खात्यात पोहोचली होती. मात्र, ती महिला प्रामाणिक निघाली आणि तिने तातडीने बँकेशी संपर्क साधला. महिलेने बँकेची चूक सांगितल्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी आपली चूक मान्य केली. काही वेळातच त्या महिलेच्या खात्यातून पैसे काढण्यात आले. वास्तविक या घटनेतून महिलेला कोणतेही बक्षीस किंवा पैसे मिळाले नाहीत, परंतु महिलेचे आयुष्य नक्कीच बदलले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना सुमारे दोन वर्षांपूर्वी घडली होती, परंतु अलीकडेच ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाली. लोकांना या घटनेची आठवण झाल्यानंतर ती महिला कुठे आहे? असे लोक विचारू लागले, त्यावेळी या महिलेचा शोध घेतले असता, तिच्याबद्दल ही माहिती समोर आली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

ही महिला अजूनही टेक्सासमध्ये आहे आणि त्यावेळी ही महिला इतकी प्रसिद्ध झाली होती की तिला अनेक ऑफर्स मिळू लागल्या. या ऑफर अंतर्गत महिलेने एक फायनान्स कंपनी उघडली होती आणि त्यानंतर तिने भरपूर पैसे कमावले होते. या महिलेने नंतर मुलांसाठीही एक एन्टरटेन्मेंट कंपनी देखील उघडली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात