मुंबई 24 जानेवारी : अमेरिकेच्या एक भयानक सिरीयल किलरबद्दल एक अशी माहिती समोर आली आहे, जी वाचून तुमच्या संवेदना उडेतील. या सीरियल किलरने एक दोन नाही तर एकामागून एक अशा 32 जणांचा बळी घेतला असल्याचे उघड झाले. या सीरियल किलरने मारलेल्या लोकांना त्याने एका मोठ्या फ्रीजरमध्ये ठेवले. पण तो एवढ्यावर थांबला नाही तर त्याची क्रुरता इतकी वाढली की त्याने या माणसांच्या मांसाचं पॅटीज बनवण्याचा विचार केला. त्याने आपले बर्गरचे स्टॉल लावले आणि त्याच्या पॅटीसमध्ये माणसांचे मांस शिजवून लोकांना खायला दिले.
या सीरियल किलरने हे काम इतक्या हुशारीने केलं की त्याच्यावर कुणाला संशयही येणार नाही. पण अखेर तो पकडला गेलाच. ज्यानंतर त्याने स्वत:च्या तोंडाने ही गोष्ट मान्य केली.
हे ही पाहा : मृत शरीरासोबत का संबंध ठेवतात अघोरी? या साधूंचे काही धक्कादायक रहस्य
डेली स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जोसेफ मेथेनी असे या सायको किलरचे नाव आहे. त्याने बहुतेक महिलांना आपला बळी बनवले. तो अमेरिकेतील बाल्टिमोर शहरात राहत होता. सीरियल किलरच्या या धक्कादायक खुलाशानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
जोसेफ मेथेनी यांनी सांगितले की, तो हत्येनंतर मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवत असे. मग तो शवाचे तुकडे इतर प्राण्यांच्या मांसात मिसळून शिजवायचा. त्यानंतर तो त्याची बर्गर पॅटी बनवतो आणि तो बर्गरमध्ये टाकून विकतो. तो माणसाचे अशा प्रकारे शिजवायचा की ते खाणाऱ्यांना फरक कळायचाच नाही.
विशेष म्हणजे, पोलिसांनी सिरियल किलर जोसेफ मेथेनी याला डिसेंबर 1996 मध्ये पकडले, जेव्हा तो मानवांची हत्या केल्यानंतर बर्गर पॅटीज विकत होता. त्याच्या स्टॉलच्या बर्गर खाणाऱ्यांना हे माहित नव्हते की मेथेनीने त्यांना नरभक्षक बनवले आहे.
खटल्यादरम्यान, सीरियल किलरने न्यायालयात सांगितले की, त्याला लोकांच्या हत्येचा कोणताही पश्चाताप नाही. उलट खुनाच्या गुन्ह्यात त्याला आनंद मिळत असे. मात्र, दोषी सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने त्याला 50 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. पण तुरुंगातच त्याचा मृत्यू झाला. 5 ऑगस्ट 2017 रोजी तो कारागृहात मृतावस्थेत आढळला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Criminal, Shocking news, Social media, Top trending, Viral