मुंबई 23 जानेवारी : हिंदू धर्मात ऋषी-मुनी साधू-संताना खूप महत्त्व आहे. आपण त्यांना देवासमान पाहातो. ते देवाशी बोलतात किंवा थेट देवाशी संपर्क साधतातअसा अनेक लोकांचा समज आहे. साधू किंवा ऋषी-मुनी हे ब्रम्हचारी, कंदमुळ खाणारी असतात आणि त्यांना वैवाहिक जीवनाचा छंद नसतो. असा आपला समज आहे. पण असं असलं तरी देखील त्यांची अनेक रूपे आहेत. जे आपल्याला माहित नाहीयत.
अघोरी पंथातील साधू हे आपण विचार करत असलेल्या गोष्टींपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. अघोरी बाबांची देवपूजा करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. त्यांची मान्यता देखील वेगळी आणि विचित्र आहे, ज्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि त्यावर विश्वास ठेवणं कठीण वाटेल.
हे ही पाहा : महिला नागा साधूंचे हे रहस्य जाणून तुम्हाला धक्का बसेल
राखेने झाकलेले लांब केस असलेल्या या अघोरी बाबांचे रूप जेवढे अनोखे आहे, तेवढेच वेगळेपण त्यांचे जीवन आहे. अघोरी बाबांच्या जीवनाशी संबंधित काही रहस्यमय गोष्टी जाणून घेऊया.
अघोरी साधू हे शिवाची पूजा करतात
अघोरी बाबा हे भगवान शिवाचे उपासक आहेत आणि ते शिवाच्या भक्तीत सदैव तल्लीन असतात. ते शिव प्रमाणेच स्मशानात राहातात, लांब केस किंवा जटा ठेवतात आणि संपूर्ण शरीराला राख फासून बसतात. ते पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी कुंभ, महाकुंभ, माघमेळा अशा खास प्रसंगीच ते जगासमोर येतात.
वास्तविक, बहुतेक अघोरी स्मशानभूमीत राहतात. अघोरींबद्दल असे म्हटले जाते की ते कच्चे मानवी मांस खातात. यासाठी ते माणसांना मारत नाहीत, पण स्मशानात जे शव आणलं जातं ते खातात, म्हणजेच आधी मेलेल्या लोकांचे मांस ते खातात, म्हणून त्यांच्या या वागण्यावर फारसं कोणी ऑब्जेक्शन घेत नाहीत.
ज्या गोष्टींचा विचार करताना सुद्धा माणसाचा आत्मा हादरतो, अशी गोष्टी हे अघोरी साधू करतात.
मृतदेहांशी शारीरिक संबंध बनवणे
अघोरींबद्दल असे म्हटले जाते की ते प्रेतांशी संबंध ठेवतात. अघोरी बाबां त्यांच्या या प्रकारामागे असं कारण सांगतात की, हा देखील त्यांच्या शिवसाधनेचा एक मार्ग आहे.
शारीरिक संबंध ठेवत असतानाही जर ते शिवाची उपासना करू शकत असतील तर ते त्यांच्या आध्यात्मिक साधनेचा उच्च स्तर आहे, असे त्यांचे मत आहे.
एवढेच नाही तर अघोरी बाबा इतर ऋषीमुनींप्रमाणे ब्रह्मचर्य पाळत नाहीत, तर महिलांच्या संमतीने त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवतात. ते शक्यतो महिलांच्या मासिक पाळीच्या काळात संबंध ठेवतात. यामागे असे कारण देखील सांगितले जाते की यामुळे अघोर विद्या मजबूत होते आणि त्यांची शक्ती वाढते.
याशिवाय अघोरी साधूंना एक गोष्ट आवडते ते म्हणजे कुत्रे, यामुळेच ते नेहमी कुत्र्यांना आपल्याजवळ ठेवतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking, Shocking news, Social media, Top trending, Viral