जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हॉटेल रुममध्ये लावलेला छुपा कॅमेरा शोधून काढण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

हॉटेल रुममध्ये लावलेला छुपा कॅमेरा शोधून काढण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

माहितीनुसार, हा कॅमेरा अशा पद्धतीनं लपवला गेला होता, की रुम स्वच्छ करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही तो दिसला नाही.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 26 ऑक्टोबर : काही वेळा पर्यटन किंवा ऑफिसच्या कामानिमित्त आपण दुसऱ्या शहरांमध्ये जातो. अशा वेळी वास्तव्यासाठी आपण हॉटेलचा पर्याय निवडतो. मात्र हा पर्याय काही वेळा जोखमीचा ठरू शकतो. कारण हॉटेलच्या रुममध्ये हिडन अर्थात छुपा कॅमेरा लावून रेकॉर्डिंग केल्याची अनेक प्रकरणं सातत्यानं समोर येऊ लागली आहेत. अशा व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढत आहेत. तुम्ही जर हॉटेलमध्ये थांबत असाल तर अशा प्रसंगांपासून सावध राहणं गरजेचं आहे. या साठी काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. नोएडामध्ये छुप्या कॅमेराच्या मदतीनं हॉटेलमधील रुममध्ये रेकॉर्डिंग केल्याचं प्रकरण काही दिवसांपूर्वी उघडकीस आलं होतं. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली. या दोघांवर हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या लोकांचे व्हिडिओ तयार करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी प्रथम हॉटेलमधली रुम बुक केली आणि त्यानंतर रुममध्ये कॅमेरा प्लांट केला. हे ही पाहा : Reel करणाऱ्या मुलांनी बस ड्रायव्हरला बनवलं मूर्ख, Video सोशल मीडियावर व्हायरल माहितीनुसार, हा कॅमेरा अशा पद्धतीनं लपवला गेला होता, की रुम स्वच्छ करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही तो दिसला नाही. अशा पद्धतीच्या अनेक घटना आत्तापर्यंत उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही कारणामुळे हॉटेलमध्ये राहणार असाल तर पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणं देखील गरजेचं आहे. हॉटेल रुममध्ये छुपा कॅमेरा नाही ना हे पाहण्यासाठी पॉवर सॉकेट, हेयर ड्रायर, फायर अलार्म असलेल्या ठिकाणांची तपासणी करावी. कारण अशा जागीदेखील कॅमेरा लपवलेला असू शकतो. अनेकदा बाथरूममधील शॉवरमध्ये कॅमेरा लपवलेला असतो. नाइट व्हिजन कॅमेरासाठी तुम्ही रुममधले सर्व दिवे बंद करून पाहावेत. सर्व दिवे बंद केल्यावर कॅमेराचे मंद लाइट लगेच लक्षात येतात. काही गुन्हेगार हॉटेल रुममधील आरश्याच्या आसपास छुपा कॅमेरा लावतात. त्यामुळे तुम्ही रुममधली कपाटं, बाथरूम आणि रुममधील आरसे तपासून पाहावे. यासाठी टू-वे मिरर टेस्ट फायदेशीर ठरते. ही टेस्ट खूप सोपी असते. यासाठी तुम्हाला तुमचं एक बोट आरशावर ठेवावं लागेल. जर तुमच्या बोटाच्या प्रतिबिंबात अंतर दिसलं तर आरसा सामान्य आहे असं समजावं. पण जर असं अंतर दिसलं नाही तर तो टू-वे मिरर आहे असं समजावं.

    News18लोकमत
    News18लोकमत

    बहुतांश कॅमेरे हे रुममधल्या डेकॉरमध्ये लपवले जातात. कॅमेरातील स्पीकर, अलार्म क्लॉकमध्ये किंवा अन्य सजावटीच्या कोणत्याही वस्तूंत कॅमेरा लपवलेला असतो. त्यामुळे रुममधील या वस्तूंची तपासणी करावी. या शिवाय टीव्ही आणि सेट टॉप बॉक्सही चेक करावा. टीव्ही आणि सेट टॉप बॉक्समधले लाईट्स चालूच असतात. त्यामुळे याकडे लोकांचे सहसा लक्ष जात नाही. नेमकी हिच बाब लक्षात घेत त्यात कॅमेरा लावला जातो. तुम्ही स्मार्टफोनचा फ्लॅशलाइट लावून या दोन्ही वस्तूंची तपासणी करू शकता. जर तुम्हाला त्यात ब्लू किंवा पर्पल लाइट दिसून आला तर तुम्ही वेळीच सावध व्हायला हवं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात