मुंबई : तुम्ही पार्कमध्ये किंवा बाहेर कुठेही फिरायला गेलात, तर संध्याकाळच्या वेळी डास बाहेर पडतात आणि माणसांवर अटॅक करतात. डास चावणं अशी तर एक सामान्य गोष्ट आहे. परंतु अनेक वेळा त्यांच्या चाव्यामुळे असे आजार होतात की लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागते.
एक अशीच धक्कादायक गोष्ट समोर आली आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल. एका महिलेला डास चावल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले नाही, तर ती कोमातही गेली होती. अखेर तिचे हात पाय कापावे लागले. त्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
उंची वाढवण्यासाठी अशा ठिकाणी केली शस्त्रक्रिया, आता आयुष्यच झालं उद्ध्वस्त!
आता याबद्दल ऐकून तुम्हाला नक्की धक्का बसला असेल की त्या महिलेसोबत नक्की असं काय घडलं? वास्तविक, ही घटना एका ब्रिटिश महिला डान्सरसोबत घडली आहे. या महिलेला डास चावल्यानंतर तिला एक सौम्य आजार झाला. या आजाराचे रूपांतर मलेरियामध्ये झाले.
मलेरिया बरा करण्यासाठी महिलेला रुग्णालयात दाखल करावे लागले आणि तिथूनच तिच्या आयुष्य उद्ध्वस्त झाले. मलेरियाच्या आजारावर उपचार सुरू असताना त्या महिलेच्या शरीरात काही असे बदल झाले की ती आणखी आजारी पडली, ती घेत असलेल्या उपचाराचा उल्टाच प्रभाव पडला. हे अत्यंत दुर्दैवी आहे.
लंडनच्या केम्बरवेलमध्ये राहणाऱ्या या महिला डान्सरचे नाव तातियाना टिमन आहे. काही दिवसांपूर्वी ती सुट्टीवर गेली होती आणि तिला डास चावल्यामुळे मलेरिया झाला. रूग्णालयात उपचारादरम्यान, तिला सेप्सिस होऊ लागला आणि औषधांनी त्याला शांत करण्यात आले. पण त्याचा आजार बरा होण्याऐवजी वाढतच गेला. उपचारादरम्यान ती काही काळ कोमातही राहिली.
शेवटी परिस्थिती अशी बनली की संसर्ग वाढल्यानंतर तिचे दोन्ही पाय आणि हात कापावे लागले. ज्यामुळे या महिलेचे संपूण आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. मिळालेल्या माहितीनुसार, कोविडच्या काळात महिलेला पहिल्यांदा हा आजार जाणवला. तिला रुग्णालयात दाखल केले असता तिला मलेरिया झाल्याचे आढळून आले. यानंतर तिचा आजार वाढला. आता ती सामान्य जीवनात परतली असली तरी शरीराचे अवयव गमावल्याने ती खूप दुःखी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking, Social media, Top trending, Viral