मुंबई : डॉक्टरांना आपण देव मानतो कारण माणसाचा जीव वाचवण्याची शक्ती त्यांच्याकडेच आहे. तसे पाहाता वैद्यकीय शास्त्राचे जग हे आश्चर्यकारक आहे. त्याच्या मदतीने अनेक अशक्य गोष्टी शक्य होतात. ज्याचा वापर करुन आजकाल अनेक लोक स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. यात वेगवेगळी सर्जरी करुन रंग बदलणे. स्माईल बदलणे, चेहरा बदलणे यासारख्या गोष्टी केल्या जातात.
या सर्जरी बऱ्याचदा सक्सेसफुल होतात. तर काही वेळा त्या फेल होतात. असाच काहीसा प्रकार एका व्यक्ती सोबत घडला. हा प्रकार अमेरिकेतील आहे. येथे एका व्यक्तीने उंच होण्यासाठी सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. मात्र हा सगळा प्रकार त्याच्यावर उलटला आहे.
महिलेनं विनाकपडे सुसाट पळवली बाईक आणि... पुढे जो प्रकार घडला तो धक्कादायक
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण काही दिवसांपूर्वीचे आहे, जे नुकतेच सोशल मीडियावर चर्चेत समोर आले आहे. हा सगळा प्रकार घडला जेव्हा एका व्यक्तीने आपली उंची वाढवण्यासाठी त्याच्या मांडीची शस्त्रक्रिया केली. हा ६८ वर्षीय व्यक्ती जेव्हा डॉक्टरांकडे गेला तेव्हा डॉक्टरांच्या टीमने त्याला उंची वाढवणाऱ्या शस्त्रक्रियेबद्दल सांगितले. यानंतर त्या व्यक्तीने ठरवले की तीच शस्त्रक्रिया करायची.
या प्रकरणात एक त्रुटी होती की ते म्हणजे या व्यक्तीचं वय, यामध्ये त्या व्यक्तीच्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. रिपोर्ट्सनुसार, या 68 वर्षीय व्यक्तीने आपली उंची तीन इंच वाढवण्यासाठी करोडो रुपये खर्च करून ही शस्त्रक्रिया केली होती. सुमारे तीन महिन्यांपासून मांडीचे हाड वाढल्याच्या असह्य वेदना सहन केल्यानंतर या व्यक्तीने आपली उंची 5 फूट 6 इंच वरून 5 फूट 9 इंच केली आहे.
या शस्त्रक्रियेसाठी त्या व्यक्तीने 1.30 लाख पौंड म्हणजेच 1.2 कोटी रुपये खर्च केले होते. ही देखील एक प्रकारची कॉस्मेटिक सर्जरी आहे पण ती थोडी वेगळी आहे.
स्वत:च्या आनंदासाठी ही शस्त्रक्रिया केल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. शस्त्रक्रियेनंतर त्याला खूप समस्या आल्या, आता या शस्त्रक्रियेनंतर व्यक्तीची प्रकृती फारशी चांगली नाही. या व्यक्तीला आता नीट चालताही येत नाहीय. या शस्त्रक्रियेच्या नादात त्याने आपलं उरलं सुरलं आयुष्य ही उद्ध्वस्त केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking, Social media, Top trending, Viral