Home /News /viral /

बापरे! डॉक्टरांनी केलं मृत घोषित, दफन करण्याआधीच उठून बसली वृद्ध महिला

बापरे! डॉक्टरांनी केलं मृत घोषित, दफन करण्याआधीच उठून बसली वृद्ध महिला

डॉक्टरांनी मृत्यूपत्र दिल्यानंतर थरथर कापायला लागली महिला, पुढे जे झालं ते वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

    मॉस्को, 20 ऑगस्ट : सिनेमांमध्ये तुम्ही मृत झालेली व्यक्ती अखेरच्या क्षणी उठून बसते, हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. पण असा प्रसंग खऱ्या आयुष्यात घडला तर? विश्वास नाही बसणार पण असा प्रकार खरच घडला आहे. असा काहीसा प्रकार रशियामध्ये खरच घडला आहे. येथे एक 81 वर्षांची आजी मृत घोषित केल्यानंतर जिवंत असल्याचे कळले. झिनिडा कोनोकोव्हाची असे या 81 वर्षीय आजींचे नाव असून त्याच्यावर 14 ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रीयेनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 1 वाजून 10 मिनिटांनी त्याचे शव शवगृहात ठेवण्यात आले. मात्र सात तासांनी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता शवगृहात काम करणारी एक कर्मचारी जोरात ओरडून बाहेर आली. वाचा-रस्त्याच्या दुतर्फा आग, अंगावर ठिगण्या उडत असूनही त्यानं गाडी थांबवली नाही! काम करत असलेल्या कर्मचारीनं पाहिले की कोनोकोव्हाची उठून बसल्या आहेत, आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. 81 वर्षीय कोनोकोव्हा यांनी पळण्यास सुरुवात केल्यानंतर महिला कर्मचारीनं त्यांना पकडले. महिला कर्मचाऱ्यानं त्यांचे शरीर आधी ब्लॅंकेटनं झाकले, त्यानंतर त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाचा-शार्कच्या जबडयात होता पत्नीचा पाय, नवऱ्यानं पाण्यात मारली उडी आणि...; पाहा VIDEO कसा घडला असा प्रकार कोनोकोव्हा जिवंत असल्याचे कळल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आनंद झाला. मात्र त्यांनी डॉक्टरांनी केलेल्या चुकीला फैलावर घेतले. डॉक्टरांनी सांगितले की, हे आमच्यासाठीही अविश्वसनीय आहे. शस्त्रक्रीया झाल्यानंतर त्यांना श्वासोच्छास बंद झाला होता. त्यांना ऑक्सिझन लावूनही काही फरक दिसला नाही. त्यांची हालचाल पूर्णपणे बंद झाली होती. त्यांची तपासणी करूनच त्यांना मृत घोषित केले होते.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या