कॅलिफोर्निया, 20 ऑगस्ट: अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात सध्या निसर्गाचे रौद्ररुप पाहायला मिळत आहे. येथील सॅन फ्रॅन्सिस्को शहरातील जंगलात भीषण आग लागली आहे. सुमारे 72 तास हे अग्नीतांडव सुरू आहे. या आगीमुळे 10 हजारहून अधिक झाडं जळून खाक झाली आहेत. तर, जंगलातील प्राणीही रस्त्यावर आल्याचे दिसत आहे.
कॅलिफोर्नियाच्या आगीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र हा व्हिडीओ पाहून धडकी भरेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये सॅन फ्रॅन्सिस्कोतील प्रसिद्ध नॅपा व्हॅलितील भीषण आग दिसत आहे. रस्त्याच्या दुतर्फा आगी लागली असूनही त्या आगीतून एक इसम गाडी चालवताना दिसत आहे. गाडी चालवत असताना, त्याच्या अंगावर ठिणग्याही उडत आहेत. मात्र त्यानं गाडी थांबवली नाही.
वाचा-72 तासांपासून जळतंय अख्खं शहर, पाहा कॅलिफोर्नियातील अग्नीतांडवाचे VIDEO
Hairy conditions as the #LNULightningComplex fire burns along both sides of Berryessa Knoxville Road near Lake Berryessa. @GettyImagesNews @CAL_FIRE pic.twitter.com/EVWKsgsump
— Justin Sullivan (@sullyfoto) August 19, 2020
वाचा-भरदिवसा व्यावसायिकाला जिवंत जाळलं; 90 टक्के भाजलं शरीर
हा व्हिडीओ सॅन फ्रॅन्सिस्कोतील पत्रकार जस्टिन सुलीवन यांनी ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये सॅन फ्रॅन्सिस्कोतील आगीचे भीषण रुप दिसत आहे. एवढेच नाही तर उत्तरेकडील, फेअरफिल्ड आणि व्हॅकव्हिली जवळ 46 हजार एकर परिसराला आग लागली. वाऱ्यामुळे ही आग एका रात्रीत पसरली. यात कमीतकमी 50 घरे आणि इतर इमारती जाळून खाक झाल्या आहेत.
वाचा-...आणि हायवेवर लेन सोडून एकमेकांवर आदळल्या 4 गाड्या, भीषण अपघाताचा VIDEO VIRAL
मध्य कॅलिफोर्नियामध्ये सॅन फ्रान्सिस्कोच्या दक्षिणेस सुमारे 160 मैल (258 कि.मी.) दक्षिणेकडील फ्रेस्नो काउंटीमध्ये हेलिकॉप्टरमधून पाण्याचा फवारा करण्यात येत होते, यावेळी एका विमानाचा अपघात झाला. या अपघाचात कॅलिफोर्नियाच्या वनीकरण व अग्निसुरक्षा विभागाच्या एका खाजगी कंत्राटदार पायलटचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Video viral