मराठी बातम्या /बातम्या /Viral /Wired News : व्यक्तीनं दाताने तोडलं अजगराचं डोकं, त्यानंतर जे घडलं ते...

Wired News : व्यक्तीनं दाताने तोडलं अजगराचं डोकं, त्यानंतर जे घडलं ते...

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

एक विचित्र प्रकरण सोशल मीडियावर समोर आलं आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला धक्का नक्की बसेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 04 फेब्रुवारी : सापाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी लोक लांब पळतात. कारण एकदा का सापाने दंश केला की त्या माणसाचं काही खरं नाही हे आपल्याला माहित आहे. त्यात काही सापांचं विष हे इतकं धोकादायक असतं की काही मिनीटातच त्या एखाद्या माणसाचा मृत्यू होऊ शकतो. पण सापाने माणसाला चावलेलं पाहिलं असेल, पण माणसाने सापाला चावलेलं कधी ऐकलंय?

असंच एक विचित्र प्रकरण सोशल मीडियावर समोर आलं आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला धक्का नक्की बसेल.

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील एका व्यक्तीने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. या व्यक्तीने अजगराला दाताने अशा प्रकारे चावले की त्याचं डोकं फाडलं गेलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा अजगर एका महिलेचा पाळीव अजगर होता आणि आरोपीचे त्या महिलेशी भांडण झाले होते.

हे ही पाहा : Video : सापाला शिकार बनवणं सिंहाला पडलं महागात, फणा काढला आणि...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी व्यक्तीचे नाव जस्टिन असून तो महिलेचा मित्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व्यक्ती त्या दिवशी महिलेच्या फ्लॅटवर गेला होता आणि दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले. भांडण इतके टोकाला गेले की त्या व्यक्तीने त्या महिलेच्या पाळीव अजगरावर हल्ला केला. त्याने अजगराचे डोके दाताने चावून तोडले.

एवढेच नाही तर त्या व्यक्तीचे महिलेशी कडाक्याचे भांडणही झाले. भांडण ऐकून महिलेचे शेजारी तेथे जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिस येण्यापूर्वीच त्या व्यक्तीने तेथून पळ काढला. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले तेव्हा त्यांना अजगर आणि त्याचं तुटलेलं डोकं आढळलं.

दुसऱ्या एका मीडिया रिपोर्टनुसार, ती महिलाही त्यावेळी घटनास्थळी नव्हती.

पोलीस पथकाने या घटनेचा तपास केला असता महिला आणि आरोपी दोघेही एकमेकांना आधीपासूनच ओळखत असल्याचे आढळून आले. घटनेच्या वेळी दोघेही एकत्र उपस्थित होते. त्यानंतर दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले. त्यानंतर दोघेही घटना स्थळावरुन पळाले. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून याप्रकरणी महिलेचीही चौकशी करण्यात येत आहे.

First published:

Tags: Shocking, Social media, Social media trends, Top trending, Viral