जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हा गोठवणारा मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा, आधी फ्रिजरमध्ये बंद केलं मग....

हा गोठवणारा मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा, आधी फ्रिजरमध्ये बंद केलं मग....

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

हत्येचा आरोप असलेला अँथनी मिशेल नावाचा व्यक्ती या जेलमध्ये बंद आहे. त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचाही आरोप आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 फेब्रुवारी : आपण अनेक क्राइमचे शो पाहातो तसेच अनेक घटना देखील तुम्ही ऐकल्या असाल. ज्यामध्ये आरोपी वेगवेगळ्या पद्धतींना अवलंबून एखाद्याला संपवतो. तसेच काही लोक अशा विचित्र पद्धतींने मरतात ज्याबद्दल ऐकून किंवा विचार करुन अंगावर काटा उभा राहातो. अशीच एक घटना अमेरिकेतून समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीचा असा काही मृत्यू झाला की त्याची चर्चा दुरवर होऊ लागली आहे. खरंतर देशभरात असे अनेक तुरुंग आहेत जे त्यांच्या क्रूरतेसाठी प्रसिद्ध आहेत. अमेरिकेतील अलाबामा जेल हे त्यापैकीच एक आहे, येथे फ्रीजरमध्ये बंद पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हे ही पाहा : जगातील असं ठिकाण जेथे महिला टांगतात आपल्या शरीराचा ‘हा’ भाग इंडिपेंडंटने दिलेल्या वृत्तानुसार, हत्येचा आरोप असलेला अँथनी मिशेल नावाचा व्यक्ती या जेलमध्ये बंद आहे. त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचाही आरोप आहे. दोन आठवड्यांपूर्वी पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याला तुरुंगात आणले आणि अचानक त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली. त्याच्या मृत्यूबद्दल कळताच एकच खळबळ उडाली. कारागृह प्रशासनावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तुरुंग कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली आणि नंतर त्याला ओढून फ्रीजरमध्ये बंद केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर तुरुंगवासीयांनी त्याला शिक्षा करण्यासाठी त्याला फ्रीझरमध्ये आधी टाकले आणि नंतर त्याला वेगाने पळायला भाग पाडले. असं देखील तपासात आढळून आले आहे. त्यानंतर त्याला पुन्हा फ्रिजमध्ये ठेवले गेले. अखेर कित्येक तासांनंतर फ्रीजर उघडले असता त्याचे शरीर बर्फासारखे गोठले होते. त्याला फ्रीजरमधून बाहेर काढले असता त्याच्या हाताची नाडी चालू असल्याचेही तपासात समोर आले आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तुरुंग कर्मचाऱ्यांनी हे सर्व जाणूनबुजून केल्याचा आरोप त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी केला आहे. याआधी ही गोष्ट लपवण्यात आली होती, मात्र जेव्हा कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजमधून संपूर्ण हकीकत समोर आली, तेव्हा कुटुंबीयांना संपूर्ण प्रकार कळला.

News18लोकमत
News18लोकमत

सध्या कारागृह प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सीसीटीव्ही फुटेजही समोर आले ज्यामध्ये मानसिक आजारी मिशेलला ओढून पोलिस व्हॅनमध्ये नेले जात असल्याचे दिसले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात