मुंबई 15 फेब्रुवारी : सध्या तुर्कस्तानमधील आपत्तीनंतर संपूर्ण जग घाबरले आहे. लोक शोक व्यक्त करत आहेत आणि मृतांना श्रद्धांजली वाहतात. दरम्यान, तुर्कस्तानमधील अशाच एका शहराबद्दल जाणून घेऊया ज्याबद्दल ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल. हे शहर कॅपाडोशिया म्हणून ओळखले जाते. या शहरात एका गोष्टीचा संग्रह आहे. येथे वेगवेगळ्या महिलांच्या शरीराचा भाग संग्रहात ठेवला गेला आहे. त्यामुळेच या संग्रहाची जगभर चर्चा आहे.
खरंतर येथे महिलांच्या केसांना लटकले जाते आणि त्यांचा संग्रह केला जातो. या बद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु हो हे सत्य आहे. तसेच या मागचे कारण हे फारच विचित्र आहे.
हे ही पाहा : हिरव्या रंगाचा कपडा बांधकाम सुरु असणाऱ्या बिल्डिंगला का लावला जातो?
वास्तविक या अनोख्या संग्रहालयाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही स्थान देण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅपाडोसिया हे जगातील हॉट एअर बलूनिंगचे केंद्र मानले जाते. मोठमोठे फुगे येथे उडताना दिसतात. तुम्ही याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पाहिले असतील.
हे हॉट एअर बलून सूर्याच्या प्रकाशात आणखी सुंदर दिसतात. ते पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात.
या म्युझियममध्ये ज्या महिला येतात, त्या आपल्या केसांचा मोठा भाग येथे ठेवतात. यामागे एक श्रद्धा आहे. असे म्हटले जाते की 35 वर्षांपूर्वी एक फ्रेंच महिला कॅपाडोसियाला भेट देण्यासाठी आली होती, तेव्हा ती येथील एका पुरुषाच्या प्रेमात पडली होती. ती येथे तीन महिने राहिली आणि नंतर जेव्हा निघायची वेळ आली तेव्हा तिने तिचे केस कापले आणि प्रेमाची आठवण म्हणून भिंतीवर टांगले.
या केसांची कहाणी इथूनच सुरू झाली. त्यानंतर येथे येणारी कोणतीही महिला आपले केस कापून भिंतीवर टांगते. काही वेळातच हे ठिकाण केसांचे संग्रहालय बनले. या संग्रहालयाचे नाव 1998 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले.
दरवर्षी या संग्रहालयाचे मालक आणि संस्थापक, गालिप पर्यटकांसाठी लॉटरी ठेवतात आणि त्यांना येथे प्रवास करायला लावतात.
या शहराची आणखी एक खास गोष्ट म्हणजे येथे वर्षातून 250 दिवस हॉट एअर बलून उडवले जातात. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतही त्याचा समावेश आहे आणि पर्यटक मोठ्या संख्येने येथे पोहोचतात. ते बलून राईडमध्ये सामील होतात आणि रॉक फॉर्मेशन-गुहांसोबत सुंदर वेळ घालवतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking, Social media, Top trending, Turkey, Viral