मराठी बातम्या /बातम्या /Viral /एक बेट मृत्यूचं! असं बेट जिथे 1 लाख 60 हजार जणांना जिवंत जाळलं, आजही भेट देण्यास आहे बंदी

एक बेट मृत्यूचं! असं बेट जिथे 1 लाख 60 हजार जणांना जिवंत जाळलं, आजही भेट देण्यास आहे बंदी

या बेटाला भेट देणं तर दूरच, पण इटालियन मच्छिमार या बेटाच्या आसपास मासेमारीही करत नाहीत. कारण येथे मासेमारीच्या जाळ्यात फक्त मानवी हाडं सापडतात असंही सांगितलं जातं.

या बेटाला भेट देणं तर दूरच, पण इटालियन मच्छिमार या बेटाच्या आसपास मासेमारीही करत नाहीत. कारण येथे मासेमारीच्या जाळ्यात फक्त मानवी हाडं सापडतात असंही सांगितलं जातं.

या बेटाला भेट देणं तर दूरच, पण इटालियन मच्छिमार या बेटाच्या आसपास मासेमारीही करत नाहीत. कारण येथे मासेमारीच्या जाळ्यात फक्त मानवी हाडं सापडतात असंही सांगितलं जातं.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई 29 ऑक्टोबर : विज्ञानाने वेगानं प्रगती केली; पण अद्यापही या काळात भूत, आत्मा याचं अस्तित्व मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळेच माणूस मंगळावर पाऊल ठेवण्याची तयारी करत असताना जगातलं एक ठिकाण असं आहे, की जिथं माणसांना रात्री काय दिवसाही जायची बंदी आहे. ते ठिकाण म्हणजे इटलीतील पोवेग्लिया बेट. जगातलं सर्वांत भयावह बेट म्हणून हे ओळखल जातं. या बेटाशी संबंधित कथा तुम्हाला थक्क करून टाकेल. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलंय.

  जगात अशी अनेक सुंदर बेटं आहेत, जिथं वर्षाचे 12 महिने पर्यटकांची गर्दी असते. ही बेटं पाहण्यासाठी लोक जगभरातून येत असतात. पण पोवेग्लिया बेट हे एक असं बेट आहे, जिथं तुम्हाला जाण्यास बंदी आहे. कारण खुद्द इटलीच्या सरकारचं असं मत आहे की, ‘हे बेट अतिशय धोकादायक असून, तिथे अशा काही गोष्टी घडतात ज्यावर विश्वास ठेवणं अवघड आहे.’ त्यामुळेच इटालियन सरकारनं या बेटावर जाण्यास बंदी घातली आहे.

  पोवेग्लिया बेटाला मृत्यूचं बेट म्हणूनही ओळखलं जातं. हे बेट व्हेनिस आणि इटलीमधील लिडो या शहरांदरम्यान व्हेनेशियन खाडीमध्ये आहे. एकेकाळी हे सुंदर बेट पर्यटकांना आवडणारं पर्यटन स्थळ होतं; पण आता या बेटावरच जाण्यास बंदी आहे.

  Explainer : धमाक्याशिवाय हाहाकार, काय आहे 'डर्टी बॉम्ब'? रशिया टेन्शनमध्ये!

  मासेमारीच्या जाळ्यात अडकतात मानवाची हाडे

  पोवेग्लिया बेट 18 एकरांवर पसरलेलं आहे. हॉन्टेड प्लेसच्या म्हणजे भुतांनी पछाडलेल्या बेटांच्या यादीत हे बेट तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसंच या बेटाला जगातील नंबर 1 हॉन्टेड बेट म्हटलं जातं. हे बेट युरोपमधील हॉन्टेड प्लेसच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या बेटावर जाण्यास सरकारने बंदी घातली असून, त्या दिशेनं कोणी फिरकतही नाही. एवढचं काय, तर या बेटाला भेट देणं तर दूरच, पण इटालियन मच्छिमार या बेटाच्या आसपास मासेमारीही करत नाहीत. कारण येथे मासेमारीच्या जाळ्यात फक्त मानवी हाडं सापडतात असंही सांगितलं जातं.

  बेटावर होतं मेंटल हॉस्पिटल, पण...

  1922 मध्ये या बेटावर एक मेंटल हॉस्पिटल बांधण्यात आलं होतं. मात्र, या हॉस्पिटलमध्ये काम करणारे कर्मचारी आणि रुग्णांनी असा दावा केला की, त्यांनी या बेटावर अनेक भुतांना पाहिलं, आत्मांचे अस्तित्व अनुभवलं आहे. हे बेट इतकं धोकादायक असल्याचं सांगितलं, जात होतं की इथले लोक असा दावा करू लागले की या बेटावर रात्रीच्या वेळी जिवंत व्यक्ती कोण आणि भुतं कोण हे ओळखणंच कठीण होतं. इथे राहणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की, रात्री येथे भीतीदायक आवाज येणं ही नित्याची बाब झाली होती. शिवाय येथे भटकणारे आत्मे आजारी रुग्णांना झपाटतात.’ त्यावेळी डॉक्टरांना समजणं कठीण होतं की एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी आहे, की तिला आत्म्यानी झपाटलंय.

  दरम्यान, अनेक डॉक्टर आणि रुग्णांचाही या बेटावर गूढ मृत्यू होऊ लागला. त्यामुळेच हे मेंटल हॉस्पिटल लवकरच बंद करण्यात आलं. त्यानंततर या बेटाचे हे रहस्य जाणून घेण्यासाठी अनेक लोक तिथे जाऊ लागले. पण या बेटावर जे कोणी गेले, त्यातील बहुतेक परत आलेच नाहीत. जे काही मोजके लोक परत आले, त्यांनी सांगितलं की, ‘हे बेट जगातील जिवंत नरक आहे. जर एखादी व्यक्ती येथे गेली, तर ती त्याच्या स्वत:च्या इच्छेनं परत येऊ शकत नाही. तिचं बेटावरून पुन्हा परत येणं ही या बेटावर राज्य करणाऱ्या भुतांच्या इच्छेवर अवलंबून आहे.

  जगातल्या सगळ्यात अस्वच्छ माणसाने 50 वर्षांनी अंघोळ करताच गमावला जीव, नेमकं काय घडलं?

  ब्रिटिश संशोधक म्हणतात...

  'द सन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ब्रिटिश संशोधक मॅट नॅडिन आणि अँडी थॉम्पसन यांनी नुकतीच सरकारच्या परवानगीनंतर या बेटाला भेट दिली. त्यांनी या बेटाचे काही व्हिडिओ आणि फोटोही शेअर केले आहेत. यामध्ये त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवलेल्या सर्व गोष्टी दाखवण्यात आल्या होत्या, ज्या डॉक्टरांनी वापरल्या होत्या. तसेच मृतदेह जाळण्यासाठी वापरलेले कंटेनरचे देखील यात फोटो होते. मॅट यांनी सांगितलं, की ‘त्या बेटावर जाणं हा खरोखरच भयानक अनुभव होता. तिकडे जात असताना इटलीतील स्थानिक टॅक्सी ड्रायव्हरही आम्ही त्या बेटावर जात असल्याचं ऐकून घाबरला होता. या बेटाचं नाव ऐकताच फक्त पोलीसच नाही, तर तिथले सामान्य लोकही घाबरतात.’

  मॅट पुढे म्हणाले, ‘जेव्हा तुम्ही तिकडे फिरत असता, तेव्हा तुम्हाला तिथे घडलेल्या भीषणतेची जाणीव होते. तिथे अनेक लोकांना जाळण्यात आल्याच्या खुणा दिसतात. तर काही जणांचा दफनविधी न करता त्यांना मृत अवस्थेत सोडून देण्यात आलं. या बेटावर असं वाटतं की, तिथे जमिनीपेक्षा अधिक मृतदेह आहेत. आम्ही तिथे असताना, आम्हाला घंटी वाजवण्याचा आवाज ऐकू आला, जो खूप भीतीदायक होता. एवढ्या वर्षांत इथे कोणी फिरकलेच नाही, त्यामुळे सगळीकडे झाडेझुडपे होती. त्यामुळे असं वाटत होतं की, आम्ही जणू काही हॉरर चित्रपटाचं शूटिंग बघायला आलो आहोत. हा अनुभव मी आयुष्यात कधीच विसरणार नाही.’

  नेमकं काय झालं होतं?

  16 व्या शतकात प्लेगची साथ इटलीमध्ये खूप वेगानं पसरली. प्लेगने बरेच जणांचा मृत्यू होत होता. संपूर्ण युरोपमध्ये या आजाराचा सर्वाधिक प्रभाव इटलीत दिसत होता. प्लेग हा रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे अतिशय वेगानं पसरत असल्यानं, इटालियन सरकारनं प्लेगनं प्लेगच्या सर्व रुग्णांना पोवेग्लिया बेटावर हलवण्याचा निर्णय घेतला. हे ठिकाण प्लेग क्वारंटाइन सेंटर केलं. तसेच या आजारामुळे मृत्यू झालेल्या लोकांचा अंत्यसंस्कारदेखील या बेटावरच करण्यात येऊ लागला. हळूहळू ही जागा आजारी माणसांनी भरून गेली आणि एक वेळ अशी आली की लाखो रुग्ण इथे राहू लागले. क्वारंटाइन सेंटर असल्यानं येथे आजारी लोकांना जास्तीतजास्त 40 दिवस ठेवण्यात येणार होतं. पण परिस्थिती इतकी बिकट झाली की, ज्याला एकदा या बेटावर आणलं गेलं त्याला येथून परत घरी गेलाच नाही.

  प्लेगची साथ सुरू असताना या बेटावर तब्बल 1 लाख 60 हजार जणांना जिवंत जाळण्यात आलं होतं, असंही काही इतिहासकार सांगतात. प्लेगच्या विनाशकारी तांडवानंतर काही काळातच ‘काळा ताप’ नावाच्या रोगानं पुन्हा एकदा इटलीत थैमान घातले होते. प्लेगप्रमाणेच या आजारावर कोणताही इलाज नव्हता. काळ्या तापामुळे अनेक लोक मरण पावले, त्या लोकांचं मृतदेह पोवेग्लिया बेटावर आणून त्यावर अंत्यसंस्कार न करता तसेच सोडून देण्यात आले. त्यामुळे ही जागा नरकासारखी झाली होती.

  दरम्यान, आजही या बेटाची दहशत परिसरातल्या लोकांवर आहे. या बेटावर गेलेला माणूस परत येत नाही अशी धारणा तिथल्या लोकांमध्ये आहे. त्यामुळे या भुताच्या बेटावर माणसांना दिवसाही जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

  First published:

  Tags: Shocking news