मराठी बातम्या /बातम्या /explainer /Explainer : धमाक्याशिवाय हाहाकार, काय आहे 'डर्टी बॉम्ब'? रशिया टेन्शनमध्ये!

Explainer : धमाक्याशिवाय हाहाकार, काय आहे 'डर्टी बॉम्ब'? रशिया टेन्शनमध्ये!

गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून युक्रेन आणि रशियादरम्यान युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे युक्रेनचे अपरिमित नुकसान झालं आहे.

गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून युक्रेन आणि रशियादरम्यान युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे युक्रेनचे अपरिमित नुकसान झालं आहे.

गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून युक्रेन आणि रशियादरम्यान युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे युक्रेनचे अपरिमित नुकसान झालं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 26 ऑक्टोबर : गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून युक्रेन आणि रशियादरम्यान युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे युक्रेनचे अपरिमित नुकसान झालं आहे. या यु्द्धादरम्यान सातत्याने अणुहल्ल्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र आता युक्रेनवर हल्ला करणारा रशिया एका गोष्टीमुळे चिंतेत आहे. अमेरिका आणि युक्रेन या यु्द्धात ‘डर्टी बॉम्ब’ चा वापर करू शकतो, अशी भीती आता रशियाला वाटत आहे. तसेच अमेरिकी प्रयोगशाळा युक्रेनमध्ये जैविक शस्त्रनिर्मिती करत असल्याचा दावादेखील रशियाने केला आहे. या पार्श्वभूमीवर ‘डर्टी बॉम्ब’ची चर्चा जगभरात सुरू झाली आहे. ‘डर्टी बॉम्ब’ म्हणजे काय, या बॉम्बचा वापर झाल्यास तो किती घातक आणि नुकसानदायक ठरू शकतो, याबाबतची माहिती जाणून घेऊया.

    युक्रेनवर हल्ला करणारा रशिया आता डर्टी बॉम्बमुळे चिंतेत आहे. अमेरिका आणि युक्रेन डर्टी बॉम्ब वापरण्यास प्रतिबंधित नियमांचे उल्लंघन करत आहे की नाही, याची चौकशी करण्यासाठी एक आयोग स्थापन करावा, अशी मागणी रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे केली आहे. अमेरिकी प्रयोगशाळा युक्रेनमध्ये जैविक शस्त्र निर्मिती करत असल्याचा दावा देखील रशियाने केला आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जगभरात ‘डर्टी बॉम्ब’ची चर्चा सुरू झाली आहे.

    बीबीसीच्या एका वृत्तानुसार, या संदर्भात रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांनी ब्रिटनचे संरक्षण सचिव बेन वॉलेस यांना फोनवरून सांगितले की ``युक्रेनकडून डर्टी बॉम्बच्या वापराबाबत आम्हाला चिंता आहे.`` यासोबतच त्यांनी अमेरिका, फ्रान्स आणि तुर्की विरोधात आपली बाजू मांडली. मात्र युक्रेन डर्टी बॉम्ब वापरण्याचा विचार करत असल्याची भीती रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी कोणत्याही पुराव्याशिवाय व्यक्त केली आहे. दुसरीकडे फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रशियाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. विशेष म्हणजे रशियाने या पूर्वीदेखील असे दावे केले आहेत.

    युक्रेन आणि रशिया युद्धामुळं चर्चेत आलेला डर्टी बॉम्ब हा अत्यंत धोकादायक समजला जातो. ज्या ठिकाणी या बॉम्बचा स्फोट होतो, त्या ठिकाणच्या लोकांना गंभीर आजार होतात, तसेच तेथील जमीन आणि अन्य वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच या बॉम्बमधून निघणारी किरणोत्सारी धूळ आणि धूर दूरवर पसरतो आणि त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. याशिवाय बाधित भागातील खाद्य पदार्थ आणि पिण्याचे पाणीदेखील संक्रमित होते. या बॉम्बचे दुष्परिणाम टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे या स्फोटाच्या व्याप्तीपासून दूर राहणं किंवा मास्क घालून घरातच राहणं होय.

    अमेरिकी हेल्थ एजन्सी सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन अर्थात सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार, डर्टी बॉम्ब हा अनेक धोकादायक पदार्थांचं मिश्रण असतो. यामध्ये डायनामाइट, किरणोत्सर्गी पावडर आणि गोळ्यांचा समावेश असतो. जेव्हा एखादा डर्टी बॉम्ब सक्रिय होतो किंवा त्याचा स्फोट होतो तेव्हा त्याचे परिणाम दूरवर जाणवतात. या बॉम्बची कक्षा खूप मोठी असते. या बॉम्बच्या स्फोटाचा परिणाम ज्या त्रिज्येत किंवा क्षेत्रात होतो, तिथं किरणोत्सर्गी घटक पसरतात. हे रेडिऑलॉजिकल डिस्पर्सल डिव्हाइस म्हणूनदेखील ओळखले जातात. या बॉम्बच्या स्फोटामुळे किरणोत्सर्गी पदार्थ हवेत पसरतात आणि मृत्यूसह अपंगत्वाचा धोका निर्माण होतो. या बॉम्बचे दुष्परिणाम टाळण्यासाठी रेडिशनपासून संरक्षण गरजेचं असतं. त्यासाठी अँटिरेडिएशन मास्क आणि अँटिरेडिएशन किट परिधान करावं लागतं. विशेष म्हणजे हवेत याचा प्रभाव अनेक वर्ष राहतो.

    अणु बॉम्ब आणि डर्टी बॉम्बमध्ये बराचसा फरक आहे. अणूचे विभाजन होऊन अणुबॉम्बचा स्फोट होतो. पण डर्टी बॉम्बचा स्फोट किरणोत्सर्गी पदार्थांच्या मिश्रणाने होतो. जेव्हा अणुबॉम्बचा स्फोट होतो तेव्हा मशरुमच्या आकाराचा अणुचा ढग तयार होतो. अणू स्फोटाची चित्र कदाचित तुम्ही पाहिली असतील. अणुबॉम्बचा स्फोट झाल्यावर धुराचे लोट कसे निर्माण होतात हे तुम्ही चित्रात पाहिलं असेल. डर्टी बॉम्बमधील घटक प्रदूषणाप्रमाणे हवेत पसरतात आणि ते एका जागेपुरते मर्यादित न राहता त्यांची व्याप्ती वाढते. जेव्हा अणुबॉम्बचा स्फोट होतो तेव्हा त्याचे तापमान चार हजार अंशांपेक्षा जास्त असते. पण डर्टी बॉम्बचे खास असे वैशिष्ट्य आहे. हा बॉम्ब सक्रिय झाल्यावर रेडिएशन जाणवत नाही पण ते विषाप्रमाणेत हवेत पसरत जाते.

    अणुबॉम्बच्या हल्ल्यात माणसाला एका क्षणात जीव गमावावा लागतो. पण डर्टी बॉम्बची गोष्ट जरा वेगळी असते. यामुळे व्यक्तीचा जागेवर मृत्यू होत नाही. मात्र त्याला गंभीर इजा किंवा आजार होण्याचा धोका असतो. तसेच यामुळे हानिकारक पदार्थ शरीरात जाऊन नुकसान होते आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

    First published: