जाहिरात
मराठी बातम्या / Viral / जगातल्या सगळ्यात अस्वच्छ माणसाने 50 वर्षांनी अंघोळ करताच गमावला जीव, नेमकं काय घडलं?

जगातल्या सगळ्यात अस्वच्छ माणसाने 50 वर्षांनी अंघोळ करताच गमावला जीव, नेमकं काय घडलं?

जगातल्या सगळ्यात अस्वच्छ माणसाने 50 वर्षांनी अंघोळ करताच गमावला जीव, नेमकं काय घडलं?

हाजीने तरुण वयात अनेक अडचणींचा सामना केला. त्यातून आलेल्या अपयशामुळे त्याने या जीवनशैलीचा अंगीकार केला. तो थंडीपासून बचाव होण्यसाठी नेहमी वॉर हेल्मेट वापरायचा

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 26 ऑक्टोबर : जगात अनेक चित्र-विचित्र गोष्टी आहेत. अनेक अवाक करणाऱ्या आणि अनाकलनीय गोष्टी नेहमीच समोर येतात. या गोष्टी ऐकल्यावर आपण केवळ अचंबितच होतो. निसर्गात होणारे बदल जसे या गोष्टींना कारणीभूत होतात. तसंच काही लोक केवळ लक्ष वेधण्यासाठी अशा काही गोष्टी करतात. यासाठी काहीजण केस वाढवतात. काहीजण नखं वाढवतात; पण कुणी वर्षानुवर्षं आंघोळचं करत नसल्याचं ऐकलंय? हे खरं वाटणार नाही पण अशी जगातील सर्वात अस्वच्छ व्यक्ती खरंच होती. ही व्यक्ती इराणमध्ये राहणारी आहे. याबद्दलचं सविस्तर माहिती जाणून घेऊ. याबद्दलची माहिती देणारं वृत्त ‘नवभारत टाईम्स’ने दिलंय. जगभरात स्वच्छता, उत्तम आरोग्याविषयी चर्चासत्र होतात. अस्वच्छपणाचे दुष्परिणाम अनेक आहेत. पण इराणमधल्या एका 94 वर्षांच्या वृद्धाने एक नाही, दोन नाही तर तब्बल 50 वर्ष आंघोळचं केली नाही. नुकताच हा वृद्ध दगावल्याची माहिती समोर आलीय. अनेक दशकं ही व्यक्ती विजनवासात (isolation) होती. अमौ हाजी असं त्या व्यक्तीचं नाव होतं. असं म्हटलं जातंय की, अमौ हाजीने गेल्या 50 वर्षांत पाणी आणि साबणाला स्पर्शही केला नव्हता. त्याला अशी भीती होती की, पाणी आणि साबणाच्या वापरामुळे त्याची तब्येत बिघडेल. दक्षिण इराणच्या फारस प्रांतात हाजी राहत होता. स्थानिक रहिवासींनी त्याला स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला, पण तो नेहमीच याला नकार द्यायचा. स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, एका क्षणी अमौ हाजी लोकांच्या दबावाखाली आला. त्याने आंघोळ केली. 50 वर्षांनंतर पहिल्यांदा त्याने ही आंघोळ केली. जगातली सगळ्यात अस्वच्छ व्यक्ती हीच हाजीची ओळख बनली होती. आगीशी खेळ अंगाशी आला, तरुणाचा स्टंट जीवावर बेतला…. Video Viral इराणच्या आयआरएनए या न्यूज एजन्सीने महत्त्वाची माहिती दिलीय. त्या माहितीनुसार, आंघोळ केल्यावर काही दिवसांनी तो आजारी पडला. रविवारी त्याचा मृत्यू झाला. 2014 साली तेहरान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत हाजी म्हणाला, ‘पॉर्क्युपाईन हा त्याचा आवडता खाद्यपदार्थ आहे. तसंच तो विटांचं बांधकाम असलेल्या झोपडीत राहतो.’ न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, ‘अनेक वर्ष आंघोळ न केल्याने हाजीची त्वचा काळी पडली होती. तसंच तो आहारात सडकं, कुजलेलं मांस खायचा आणि अस्वच्छ, घाणेरडं पाणी प्यायचा.’ सिगारेट पिण्याची जडली सवय तेहरान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, हाजीने तरुण वयात अनेक अडचणींचा सामना केला. त्यातून आलेल्या अपयशामुळे त्याने या जीवनशैलीचा अंगीकार केला. तो थंडीपासून बचाव होण्यसाठी नेहमी वॉर हेल्मेट वापरायचा. हाजी खूप सिगारेट ओढायचा. तो नेहमी गंजलेल्या पाईपच्या तुकड्यात जनावरांची विष्ठा भरून सिगरेट तयार करायचा आणि ती सिगरेट तो ओढायचा. आंघोळ करून आपण आजारी पडू असं तो नेहमी म्हणायचा. कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं कमी केलं तब्बल 112 किलो वजन, सांगितलं आपलं सीक्रेट आंघोळीचं नाव काढलं तरी व्हायचा अस्वस्थ अनेक जुन्या फोटोंतून हाजी सिगारेट ओढताना दिसतो. एकावेळेस तो चार सिगारेट ओढतानाचा फोटोही आहे. न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, आंघोळीचं नाव काढलं आणि स्वच्छ पाणी पिण्यास दिल्यावर तो नाक मुरडायचा. अनेक वर्ष आंघोळ न केल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हाजीच्या नावावर आहे. परंतु, काही लोकांचे याबाबत दुमत आहे. असं सांगितलं जातंय की, 2009 साली एका भारतीय व्यक्तीने तब्बल 35 वर्षं दातही घासलेले नाहीत आणि आंघोळही केली नाही असा दावा केला होता. पण त्या व्यक्तीचं पुढे काय झालं याबाबत पुरेशी माहिती नाही. त्यामुळे हाजीच जगातील सर्वांत अस्वच्छ व्यक्ती ठरला. माणसाला आयुष्यात अपयश आल्यावर तो किती टोकाचा निर्णय घेऊ शकतो हेच हाजीच्या उदाहरणावरून सिद्ध होते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात