मराठी बातम्या /बातम्या /Viral /लिफ्टमध्ये अडकला कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा, पुढं जे घडलं.. पाहा थरारक VIDEO

लिफ्टमध्ये अडकला कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा, पुढं जे घडलं.. पाहा थरारक VIDEO

 'देव तारी त्याला कोण मारी' असं म्हटलं जातं. एक व्हिडिओ पाहिल्यानंतर याचा पुन्हा प्रत्यय येईल. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती याची तंतोतंत प्रचिती देणारा हा व्हिडिओ आहे.

'देव तारी त्याला कोण मारी' असं म्हटलं जातं. एक व्हिडिओ पाहिल्यानंतर याचा पुन्हा प्रत्यय येईल. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती याची तंतोतंत प्रचिती देणारा हा व्हिडिओ आहे.

'देव तारी त्याला कोण मारी' असं म्हटलं जातं. एक व्हिडिओ पाहिल्यानंतर याचा पुन्हा प्रत्यय येईल. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती याची तंतोतंत प्रचिती देणारा हा व्हिडिओ आहे.

   मुंबई,3 नोव्हेंबर- 'देव तारी त्याला कोण मारी' असं म्हटलं जातं. चीनमधला एक व्हिडिओ पाहिल्यानंतर याचा पुन्हा प्रत्यय येईल. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती याची तंतोतंत प्रचिती देणारा हा व्हिडिओ आहे. चीनच्या हुबेई प्रांतात (Hubei Province) एखा डिलिव्हरी बॉयने एका कुत्र्याचा जीव वाचवला आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येक जण डिलिव्हरी बॉयच्या प्रसंगावधानाचं कौतुक करत आहे. इमारतीच्या लिफ्टचा दरवाजा उघडल्यानंतर या डिलिव्हरी बॉयला कुत्रा दोरीला लटकलेला दिसला. हा कुत्रा संकटात असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि आधी तो घाबरला; पण नंतर प्रसंगावधान राखत त्यानं या कुत्र्याचा पट्टा सोडवला आणि त्या कुत्र्याला जवळ घेतलं.

  23 ऑक्टोबर रोजी चीनच्या हुबेई प्रांतात घडलेली ही घटना आहे. एका इमारतीच्या लिफ्टच्या दरवाज्यात एक कुत्रा अडकला होता. या कुत्र्याच्या गळ्यातला पट्टा लिफ्टमध्ये अडकला आणि तेवढ्यात लिफ्ट अचानक सुरू झाली. या कुत्र्याचा जीव गेलाच असता; पण नशिबानं एक डिलिव्हरी बॉय तिथं आला आणि त्यानं या कुत्र्याचा जीव वाचवला. यू-ट्यूबवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 21 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

  साउथ चायना मॉर्निंग पोस्टने (South China MOrning) त्यांच्या वेबसाइटवर हे सीसीटीव्ही फुटेज शेअर केलं आहे. ही दृश्यं बघून थरकाप उडतो. त्यात असं दिसतं, की एका इमारतीतल्या लिफ्टचा दरवाजा उघडला आणि हा एक पाळीव कुत्रा आत गेला. त्यानंतर लिफ्ट बंद झाली; मात्र या कुत्र्याच्या गळ्यातला पट्टा लिफ्टमध्ये अडकला होता आणि लिफ्ट सुरू झाल्यावर पट्टा अडकलेला असल्याने कुत्रा धडपडायला लागला. त्याच वेळेस खालच्या मजल्यावरचा लिफ्टचा दरवाजा उघडला आणि तिथे उभ्या असलेल्या डिलिव्हरी बॉयनं या कुत्र्याचा जीव वाचवला. हा व्हिडिओ प्रत्यक्ष बघितल्यावरच या सगळ्या घटनेचा अंदाज येईल.

  यापूर्वी 2019 मध्ये अमेरिकेत टेक्सासमध्येही अशाच प्रकारे एका लिफ्टमध्ये कुत्र्याचा पट्टा अडकला होता. त्या वेळेस जॉनी मॅथिस नावाच्या 27 वर्षांच्या तरुणानं त्या कुत्र्याचा जीव वाचवला होता. ही आताची घटना पाहून अनेकांना त्या घटनेचीच आठवण झाली.

  (हे वाचा:पाण्यात बुडत होता कुत्रा, जीवावर खेळत माणसानं वाचवले प्राण; पाहा VIDEO)

  व्हिडिओवर अनेक जणांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यात डिलिव्हरी बॉयचं कौतुक केलं आहे. या डिलिव्हरी बॉयनं ही परिस्थिती ज्या प्रकारे हाताळली त्याचं खरंच कौतुक करावं थोडंच आहे, अशी कमेंट एका युजरनं केली आहे. या कुत्र्याचं दैव बलवत्तर म्हणून अगदी वेळेवर हा डिलिव्हरी बॉय तिथं आला आणि त्यानं त्याला वाचवलं, असं आणखी एका युजरनं लिहिलं आहे.कोणी काही म्हणो, पण खरोखरच हा डिलिव्हरी बॉय या कुत्र्यासाठी त्या वेळेस देवदूत बनून आला. तो नसता तर या मुक्या प्राण्याचा जीव हकनाक गेला असता हे मात्र नक्की.

  First published:
  top videos

   Tags: Video viral, Viral