जाहिरात
मराठी बातम्या / Viral / भयानक अपघात! आई-वडील खाली पडले, पण चिमुकल्यासह 500 मीटरपर्यंत रस्त्यावर धावत राहिली दुचाकी अन्..VIDEO

भयानक अपघात! आई-वडील खाली पडले, पण चिमुकल्यासह 500 मीटरपर्यंत रस्त्यावर धावत राहिली दुचाकी अन्..VIDEO

भयानक अपघात! आई-वडील खाली पडले, पण चिमुकल्यासह 500 मीटरपर्यंत रस्त्यावर धावत राहिली दुचाकी अन्..VIDEO

या अपघातात दुचाकीस्वार आणि त्याची पत्नी जागीच पडतात, मात्र दुचाकी पुढे जात राहते आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे त्या बाईकवर एक लहान मुलगा बसलेला आहे, तो खाली न पडता दुचाकीसोबतच पुढे जातो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 07 जानेवारी : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत राहतात. यात बऱ्याचदा अपघाताचे व्हिडिओही पाहायला मिळतात. काही रस्ते अपघात हे किरकोळ असतात, ज्यात कोणाला फार दुखापत होत नाही. मात्र काही अपघात इतके भयानक असतात की ते पाहूनच अंगावर काटा येतो. सध्या अशाच एका भयानक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. धावत्या ट्रेनमध्ये चढताना खाली पडला अन् तसाच फरफटत गेला वृद्ध, मग..; धक्कादायक घटनेचा Video Viral लोकांना नेहमी असा सल्ला दिला जातो, की रस्त्यावर वाहने नेहमी सावकाश चालवावी. मात्र, अनेकदा लोक या सूचनांकडे दुर्लक्ष करतात आणि अतिशय निष्काळजीपणे वाहनं चालवतात. अशात रस्त्यावर अचानक काही समोर आल्यास ते गाडी बॅलन्स करू शकत नाहीत आणि मग अनेकदा मोठ्या दुर्घटना होतात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हि़डिओमध्येही असंच काहीसं पाहायला मिळालं. यात वेगात गाडी चालवत असतानाच एका व्यक्तीचा अपघात झाला, यावेळी त्याच्यासोबत दुचाकीवर त्याची पत्नी आणि छोटं बाळही होतं.

जाहिरात

रस्त्यावरील वाहनं आपापल्या अगदी वेगाने धावत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, एक दुचाकीस्वार भरधाव वेगाने येतो आणि अचानक समोरून येणाऱ्या दुचाकीला धडकतो. या अपघातात दुचाकीस्वार आणि त्याची पत्नी जागीच पडतात, मात्र दुचाकी पुढे जात राहते आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे त्या बाईकवर एक लहान मुलगा बसलेला आहे, तो खाली न पडता दुचाकीसोबतच पुढे जातो.

News18लोकमत
News18लोकमत

सुमारे 500 मीटर गेल्यावर दुचाकी रस्त्याच्या कडेला पडली आणि बालकही तिथेच पडला. मात्र हा मुलगा पूर्णपणे सुखरूप बचावला, ही आनंदाची बाब आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @HasnaZarooriHai नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, की आई-वडील दोघंही दुचाकीवरुन पडले, मात्र बाईक या लहान मुलाला घेऊन तब्बल ५०० मीटर पुढे चालत राहिली. यानंतर बाळ रस्त्याच्या डिव्हायडरवरील झाडीमध्ये पडल्याने सुरक्षित राहिलं. अवघ्या 57 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 13 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला असून अनेकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात