मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO : सिग्नलवर भीक मागताना एक हात नव्हता, पोलीस आले तर दोन्ही हात जोडून उभा राहिला तरुण, काय आहे प्रकरण?

VIDEO : सिग्नलवर भीक मागताना एक हात नव्हता, पोलीस आले तर दोन्ही हात जोडून उभा राहिला तरुण, काय आहे प्रकरण?

वाहतूक पोलिसाने यासंदर्भातील एक VIDEO शूट केला आहे.

वाहतूक पोलिसाने यासंदर्भातील एक VIDEO शूट केला आहे.

वाहतूक पोलिसाने यासंदर्भातील एक VIDEO शूट केला आहे.

इंदूर, 14 ऑगस्ट : एखादी गरीब किंवा अपंग व्यक्ती भीक मागत असल्याचं पाहिलं तर आपण जेवढे शक्य तेवढे पैसे काढून देतो. मात्र नेहमीच अशा व्यक्ती विश्वासार्ह नसल्याचं या व्हिडीओवरुन समोर येत आहे. मध्य प्रदेशची राजधानी इंदूरच्या (Indore News) रस्त्यांवर भीक मागत असतानाचा एक व्हिडीओ समोर आहे. नागरिकांना कशा प्रकारे वेडं बनवलं जात असल्याचं हे उदाहरण आहे. येथे भीक मागण्यासाठी फसवणूक केली जाते. येथील गँगचा हा सदस्य 25 वर्षांचा आहे. (Viral Video)

तो दिव्यांग बनून एलआयजीच्या चौकात भीक मागत होता. त्याला पाहून वाहतूक पोलिसाने विचार केला की, त्याचा नकली हात बनवून थोडी फार मदत करता येईल. जसं त्या व्यक्तीने हाताबद्दल विचारलं तर तरुणाचा खरा चेहरा समोर आला. तो तेथून पळून गेला. त्यानंतर पोलिसाने त्याचा पाठलाग केला व त्याला पकडलं. जेव्हा पोलिसाने पाहिलं तेव्हा त्याचे दोन्ही हात व्यवस्थित होते. त्याने भीक मागण्यासाठी कुरत्यामध्ये हात लपवले होते. पाहणाऱ्याला तो खरंच दिव्यांग असल्याचं वाटत होते. (No one hand while begging at the signal when the police came the young man stood with both hands joined viral video)

हे ही वाचा-लग्नाच्या 8 वर्षांनंतर पडली प्रेमात; पतीने घटस्फोट देऊन पत्नीचं लावलं दुसरं लग्न

पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर तरुणाने खरी परिस्थिती सांगितली. अशी एक गँग शहरात कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं. ही घटना शुक्रवारी एलआयजी चौकात घडली. वाहतूक पोलिस सुमंत सिंह यांनी सांगितलं की, एका दिव्यांगाला पाहून तो मदत करू इच्छित होता. त्याला हात पाहण्यास गेला तर तो तेथून पळाला. कसं-बसं करून त्याने तरुणाला पकडलं. जेव्हा त्याचं शर्ट काढलं तेव्हा हा दिव्यांग नसल्याचं उघड झालं. तो कशा प्रकारे आपले हात लपवत होता, हेदेखील यावेळी त्याने सांगितले. आता दिल्ली पोलिसांनी खोटं बोलून दिव्यांग असल्याचं सांगून भीक मागणाऱ्यांविरोधात अभियान सुरू केलं आहे. काही लोकांना तुरुंगात पाठविण्यात आलं. त्यामुळे अनेक लोक इंदूरसह अनेक जिल्ह्यात पळून गेले आहे. यांच्यासह आणखी एक गँग असून जी अपघात झाल्याचं खोट सांगून कारमधील प्रवाशांची पर्स आणि मोबाइल चोरतात.

First published:

Tags: Indore News, Shocking viral video, Viral video.