मुंबई : प्रेमाविषयी किंवा जोडीदारापासून लांब गेल्यावर अनेक लोक शायर बनतात किंवा शायरी करु लागतात. तर काही लोक आपली आवड म्हणून शायरी करतात. पण एखाद्या व्यक्तीने आपल्या शायरीमध्ये स्वत:ला विसरण्याबद्दल सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर? नक्कीच सगळ्यांना आश्चर्य वाटेल आणि नक्की काय घडलं असेल? असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात येईल. या मृत्यूचं गुढ नक्की काय किंवा हे कसं झालं असेल? असा अनेक लोक विचार करत आहेत. हा एक खरा प्रकार आहे, जो मध्य प्रदेशातील रीवा येथे घडला, हे एक विचित्र प्रकरण आहे. येथे शिवम पांडे नावाच्या तरुणाने सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करून त्याच्या मृत्यूचे संकेत दिले आणि दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. पुरुषच नाही तर इथे महिलाही फिरतात विनाकपड्यात हा व्हिडीओ पाहून शिवमला मृत्यूची आधीच जाणीव झाली होती आणि एक दिवस आधी त्याने त्याच्या शायरीतून जे शब्द मांडले होते ते वास्तवात बदलले. विशेष म्हणजे या तरुणाने आत्महत्या केली नाही, तर त्याचा अपघात झाला. आता त्याने आपल्या मृत्यूचा अंदाज वर्तवणे हा एक योगायोग समजावा की यामागे काही रहस्य आहे? असाच अनेकांना प्रश्न पडलाय. शिवमच्या मित्रांचे म्हणणे आहे की, त्याने एक दिवस आधी ही शायरी गंमतीने त्यांना सांगितली होती. यादरम्यान कोणीतरी त्याचा व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. व्हिडीओमध्ये शिवमचे शब्द होते की, तुझ्याच्या शहरातील हवामान खूप आनंददायी आहे, मी एक संध्याकाळ चोरली पाहिजे पण तुझी हरकत नसावी. जर तुला शक्य असेल तर मला विसर, मला विसरायला तुला खुप वेळ लागले. (तुम्हारे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे, मैं एक शाम चुरा लूं. अगर तुन्हें बुरा न लगे… तुम्हारे वश में अगर हो तो भूल जाना मुझे, तुम्हें भुलाने में शायद मुझे अब जमाना लगे.) त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवम पांडेचा एका वेदनादायक रस्ता अपघातात मृत्यू झाला, ज्यानंतर त्याचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींना मोठा धक्का बसला आहे. शिवमच्या कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने बोललेले शब्द लोकांना आश्चर्यचकित करत आहेत.
24 वर्षीय शिवमचा संजय गांधी हॉस्पिटल रीवा ते मेडिकल कॉलेज जबलपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिवमच्या मृत्यूमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.