जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पुरुषच नाही तर इथे महिलाही फिरतात विनाकपड्यात

पुरुषच नाही तर इथे महिलाही फिरतात विनाकपड्यात

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

लोक या 5 ठिकाणी कपड्यांशिवाय फिरतात, कोणाला लाज वाटत नाही, कोणताही कायदा त्यांना रोखत नाही!

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : तुम्ही शाळेत हे शिकला असाल की आपले पूर्वज किंवा आधीचा माणूस हा गुहेत राहायचा आणि हेच त्याचं घर होतं. शिवाय आधीची माणसं कपडे देखील घालायची नाहीत. त्यानंतर कालांतराने माणसामध्ये बदल होऊ लागले, ज्यानंतर माणसाने अंगावर झाडाची पानं किंवा खोडाच्या साली गुंडाळायला सुरुवात केली. आता तुम्ही माणसाला पाहिलं तर संपूर्ण कपड्यात आपल्याला लोक फिरताना दिसतात. अलीकडच्या काळात लागलेल्या शोधामुळे आणि माणसाने केलेल्या प्रगतीमुळे हा बदल घडून आला. आता लोक कपड्यांच्या स्टाईलवरही खूप प्रयोग करतात. आता माणसाला कपड्यांशिवाय राहालं सांगितलं तर विचित्र वाटतं किंवा कन्फर्टेबल वाटत नाही. पण असं असलं तरी जगात असे काही लोक आहेत ज्यांना कपडे न घालता फिरणे अधिक मोकळे वाटते किंवा चांगले मानले जाते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांबद्दल सांगतो, जिथे लोक कपड्यांशिवाय फिरतात. मुंबईतील अशी ‘ही’ 5 ठिकाणं, जिथे एकटं जाण्याची चुक कोणीही करत नाही अशी तब्बल 6 ठिकाणं असल्याची माहिती समोर आली आहे. चला जाणून घेऊ कॅप डी’एग्डे, ज्याला फ्रान्सचे नग्न शहर म्हणून ओळखले जाते, ते असे ठिकाण आहे जिथे लोक त्यांना हवे ते घालतात किंवा ज्यांना कपडे घालायचे नाहीत ते कपडे घालत नाहीत. इथे लोक विना कपड्यांशिवाय रस्त्यावर फिरताना आढळतील. मॉल्स, रेस्टॉरंट्स, सर्वत्र लोक कपड्यांशिवाय फिरतात आणि शहराच्या नियमांनुसार ते पूर्णपणे कायदेशीर आहे. यावर कोणतेही बंधन नाही. दरवर्षी 12 मार्च रोजी वेगवेगळ्या शहरांमध्ये नेकेड बाईक राइड रेस आयोजित केली जाते. निरोगी शरीराला प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम केला जातो. या रॅलीत लोक त्यांच्या सायकलसह भाग घेतात आणि या दरम्यान ते स्वतः काही कपडे परिधान करत नाहीत. अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतात एक खास समुद्रकिनारा आहे, जिथे लोक कपड्यांशिवाय दिसतात. याला नेकेड बीच असे म्हणतात, तर त्याचे खरे नाव हौलोवर बीच आहे. मियामीच्या या बीचवर कपडे घालायचे की नाही घालायचे हा तुमचा निर्णय आहे. येथे बहुतेक लोक कपड्यांशिवाय किंवा नाममात्र कपड्यांमध्ये दिसतात. जपानची राजधानी टोकियोमध्येही गरम पाण्याने आंघोळ करण्याची प्रथा आहे. इथे त्याला ओंसेन म्हणतात. प्राचीन काळी जपानमध्ये स्त्रिया आणि पुरुष कपड्यांशिवाय आंघोळ करत असत आणि आता देखील तेथे असा एक इवेंट असतो, येथे लोकांनी कसे ही कपडे घालण्याचे किंवा न घालण्याचे स्वातंत्र्य आहे. ऑस्ट्रियामध्ये दरवर्षी नेकेड आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. जगभरातील लोक येथे येतात, जे कपड्यांशिवाय राहतात. त्यांच्या अंगावर भडक रंगांची पेंटिंग आहे, जणू तो स्वतःच एक हलणारा कॅनव्हास आहे.

News18लोकमत
News18लोकमत

याशिवाय ब्रिटनमधील हर्टफोर्डशायरमधील स्पीलप्लॅट्झ नावाचे गाव कपड्यांशिवाय राहणाऱ्या लोकांसाठी प्रसिद्ध आहे. येथील लोक खूप श्रीमंत आणि सुशिक्षित आहेत पण ते कपडे घालत नाहीत. येथे ही परंपरा येथे 1929 पासून सुरू आहे. ते गावाबाहेर गेल्यावर कपडे घालतात पण गावात कपड्यांशिवायच फिरतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात