नवी दिल्ली 03 मार्च : अनेक वेळा आश्चर्यकारक पराक्रम करण्याची किंवा साहसाचा आनंद घेण्याची इच्छा माणसाला महागात पडू शकते. ही फक्त बोलण्याची गोष्ट नाही तर अनेकदा असं घडतानाही दिसून आलं आहे. मनोरंजन, साहस आणि मौजमजेच्या नावाखाली उचललेलं पाऊल कधीकधी लोकांना चांगलंच महागात पडतं. असाच काहीसा प्रकार एका व्हायरल व्हिडिओमध्ये दिसला, जो पाहून तुमचा थरकाप उडेल. कदाचित कमकुवत हृदय असलेले लोक हा व्हिडिओ पुन्हा पाहू शकत नाहीत. अजगराने घातला मानेला विळखा, वृद्ध जमिनीवर कोसळला तरी सोडलं नाही, थरकाप उडवणारा VIDEO असा एक व्हिडिओ afzal__150k या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. यात दिसतं, की समुद्रात चाललेल्या जहाजेवरून एका व्यक्तीने जबरदस्त उडी घेतली. पण हे साहस त्याला इतकं महागात पडेल, असा विचार त्याने स्वतःही केला नसेल. त्याने जहाजातून उडी मारताच विशाल माशाने त्याला गिळून घेतलं. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल.
व्हायरल व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. समुद्रातील आश्चर्यकारक पराक्रम आणि साहसांचे अनेक व्हिडिओ अनेकदा पाहायला मिळतात, परंतु याआधी कॅमेरात कैद झालेली अशी घटना क्वचितच कोणी पाहिली असेल. व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की एका व्यक्तीने समुद्राच्या आत असलेल्या एका मोठ्या जहाजातून समुद्रात उंच उडी मारली आहे. पण तो पाण्यात डुबकी मारण्याआधीच एका विशाल शार्कने त्याला मध्येच पकडलं. ज्याने हा व्हिडिओ पाहिला तो थक्क झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बरेच वापरकर्ते असे आहेत, ज्यांचा या व्हिडिओवर विश्वास बसत नाही. त्यामुळे काही लोक याला फिल्मी सीन म्हणत आहेत, तर काहीजण याला कॅमेऱ्याची कमाल म्हणत आहेत. तर अनेक वापरकर्त्यांनी याला वेदनादायक अपघात म्हटलं आहे.