अबबं! 100 वर्षांचा अवाढव्य मासा, वजन पाहून मच्छिमारही चक्रावला

अबबं! 100 वर्षांचा अवाढव्य मासा, वजन पाहून मच्छिमारही चक्रावला

अमेरिकेतील फिश अँड वाइल्डलाईफ सर्व्हिस (U.S. Fish and Wildlife Service) या विभागाने डेट्रॉइटमधल्या नदीतून 100 वर्ष वयाच्या मादी माशाला पकडलं. त्याचं वजन केलं तर ते 108 किलो भरलं.

  • Share this:

मिशिगन, 4 मे : जगात अनेक अजब गोष्टी असतात, ज्याच्याशी आपला संबंध येतो तेव्हाच त्या माहिती होतात, तर कित्येक गोष्टी अज्ञातच राहतात. अमेरिकेत अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण बाब तिथल्या वन्य अधिकाऱ्यांना नुकतीच समजली. अमेरिकेतील फिश अँड वाइल्डलाईफ सर्व्हिस (U.S. Fish and Wildlife Service) या विभागाने डेट्रॉइटमधल्या नदीतून 100 वर्ष वयाच्या मादी माशाला पकडलं. त्याचं वजन केलं तर ते 108 किलो भरलं. त्यांनी लगेच त्या मादीला पाण्यात सोडून दिलं. या अधिकाऱ्यांनी सांगितलं, ‘आम्ही जो हूपर (Whopper) मासा पकडला होता तो गोड्या पाण्यातला सगळ्यात मोठा आकार असलेला मासा होता, त्यामुळे त्याला रियल लाइफ रिव्हर मॉन्स्टर म्हणता येईल. तो स्टर्जन (sturgeon) प्रकारात मोडतो. या माशाची लांबी 7 फूट होती, तसंच त्याचा आकार आम्ही पाहिला त्यावरून ती मादी असावी असा आमचा अंदाज आहे. ही मादी गेल्या 100 वर्षांहून अधिक काळ या पाण्यात विहार करत असावी. तिचं वजन करून आम्ही तिला लगेच पाण्यात सोडून दिलं.’

या विभागाने फेसबुकवर या माश्याचा फोटो शेअर केला आहे. रियल लाइफ रिव्हर मॉन्स्टर, असं कॅप्शन त्यांनी या माशाला दिलं आहे. हा फोटो 24 हजारांहून अधिक वेळा शेअर केला गेला.

मिशिगन डिपार्टमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेसच्या अभ्यासानुसार स्टर्जन माशांच्या नराचं आयुष्य साधारण 55 वर्षांचं तर मादीचं 70 ते 100 वर्षांचं असतं.

डेट्रॉइटच्या दक्षिणेला ग्रास इल या ठिकाणी 22 एप्रिलला हा मासा सापडला होता. तीन जणांचा गट स्टर्जन माशांसंबंधी वार्षिक अभ्यास करताना त्यांना हा मासा सापडला. नदीच्या पाण्यात खोलवर असणाऱ्या या माशाच्या आवडीचं फ्रोझन राउंड गोबी हे अन्न गळाला लावून त्याला पकडण्यात आलं होतं. पेग विगरेन आणि जेनिफर जॉन्सन या बायोलॉजिस्ट सोबत असलेल्या जेसन फिशरने सांगितलं, ‘जाळ्यात अडकलेला मासा बोटीत घ्यायला 6 मिनिटं लागली. जसं आम्ही त्याला वर ओढत होतो तस तसं त्याचा मोठा आकार आम्हाला दिसला.’

पेग म्हणाली, ‘हो, ही खरोखरच मस्त फिश स्टोरी ठरणार आहे. ती मादी दमली होती त्यामुळे तिनी फारसा प्रतिकार केला नाही.’ मिशिगनमध्ये तलावात सापडणारे स्टर्जन मासे ही दुर्मिळ प्रजाती मानली जाते. तलावांत गळ टाकून मासे पकडणारे वर्षात एक स्टर्जन मासा घरी घेऊन जाऊ शकतात पण त्याचा आकार सरकारने निश्चित केला आहे. डेट्रॉइट नदीतून पकडलेले सगळे स्टर्जन पाण्यात सोडावेच लागतात असाही कायदा आहे.

First published: May 4, 2021, 7:46 AM IST
Tags: fishUSA

ताज्या बातम्या