नवी दिल्ली 17 जून : या पृथ्वीतलावर एकापेक्षा एक धोकादायक जीव राहतात. त्यांच्यापासून प्रत्येकाने दूर राहणंच हिताचं आहे, नाहीतर ते कधी काय करतील, हे कोणीच सांगू शकत नाही. सिंह आणि वाघ यांसारख्या प्राण्यांची गणना पृथ्वीवरील सर्वात धोकादायक प्राण्यांमध्ये केली जाते. तसेच शार्कची गणना धोकादायक समुद्री जीवांमध्ये केली जाते. त्यामुळे त्याच्यासोबत पंगा घेण्याचा कोणी प्रयत्नही करत नाही. बोटीवर बसूनही एखाद्याला समुद्रात शार्क दिसला, तर तो व्यक्ती लगेच तिथून पळून जातो. अशा स्थितीत जरा विचार करा, की एखाद्याने शार्कला चिडवण्याची चूक केली तर काय होईल? असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो अंगावर काटा आणणारा आहे. फिरत्या पंख्यात अडकलेला विषारी साप खाली बसलेल्या व्यक्तीच्या अंगावर पडला अन्…थरकाप उडवणारा VIDEO व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक लहान शार्क पाण्यात पोहत आहे आणि एक माणूस बोटीच्या वर बसून त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहे. या व्यक्ती कधी त्याला हात लावतो, तर कधी त्याला धरून वर आणण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान, शार्क त्याचा हात पकडतो. मग काय, माणसाची अवस्था बिकट होते. शार्कच्या तोंडातून हात सोडवण्याच्या प्रयत्नात तो घामाघूम झाला. सुदैवाने शार्क आकाराने लहान आहे, त्यामुळे त्या व्यक्तीला फारशी इजा होत नाही. त्याच्या जागी मोठा शार्क असता तर या व्यक्तीला जीव गमवावा लागला असता.
हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ ट्विटरवर @cctvidiots नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 12 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 4.3 मिलियन म्हणजेच 43 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 10 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक देखील केलं आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, शार्कला एकटं सोडा, अन्यथा तो धोकादायक ठरू शकतो. तर दुसऱ्या युजरने विचारलं, की शार्कचा चावाही विषारी असतो का?

)







