मुंबई, 01 ऑगस्ट : सोशल मीडियावर(Social media) गेलात की तुम्हाला अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांच्या तोंडात ‘बसपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे…’(Bachpan ka Pyar Song) हे गाणं ऐकायला मिळेल. एका चिमुकल्याच्या या मजेशीर लव्ह साँगने (Love song) सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या गाण्यावर रिल्स, मिम्स बनवले जात आहेत. आता हाच चिमुकला आपल्या आवाजात आणखी एक लव्ह साँग घेऊन आला आहे. बसपन का प्यारमुळे (Baspan Ka Pyar) फेमस झालेल्या सहदेव कुमार दिरदोने (Sehdev Kumar) आता ‘हम तुम प्यार में डूबे’ गाणं आणलं आहे. त्याचं हे गाणंसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. खबर बस्तर यूट्युब पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
या चिमुकल्याचं बसपन का प्यार गाणं ऐकल्यानंतर बॉलिवूड सिंगर बादशाहनेसुद्धा सहदेवशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधला आणि त्याला आपल्याला भेटायला बोलावलं. तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीसुद्धा त्याची भेट घेतली आणि त्याच्याकडून गाणं ऐकलं. त्यांनी स्वतः आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला होता. हे वाचा - VIDEO: एक विवाह ऐसा भी! या जोडप्याचं लग्न पाहण्यासाठी झालं ‘ट्रॅफिक जॅम’ ‘बचपन का प्यार कभी भूल नही जाना रे’, या ओळी हा चिमुकला गातो तेव्हा. बचपन या शब्दाऐवजी बसपन असा शब्द उच्चारतो. मात्र हाच शब्द सध्या इन्ट्राग्रामवर ट्रेंडिंग झाला असून बसपन का प्यार सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रेंडिंग असल्याचं चित्र आहे. शाळकरी वयातलं आपलं प्रेम हा सर्वांच्याच आवडीचा विषय असतो. मनाच्या एका कोपऱ्यात साठवून ठेवलेल्या अशा काही आठवणींना उजाळा मिळणं किंवा पुन्हा एकदा त्या काळातल्या आठवणींमध्ये रमण्याचं निमित्त मिळणं, हे सामान्यांना नेहमीच आवडतं. या मुलाचा व्हिडिओ व्हायरल होण्यामागे कदाचित हे कारणदेखील असेल, असा अंदाज व्यक्त होतो आहे. हे वाचा - नणंदेसोबत नव्या नवरीचे ठुमके; जबरदस्त Dance Video जिंकतोय नेटकऱ्यांची मनं बसपन का प्यारनंतर त्याचं हम तुम प्यार में डूबे गाणंही तितकंच तुफान व्हायरल होईल अशी आशा आहे.