जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Shocking secrets : हा फोटो साधा नाही.... याचं सत्य जाणून तुम्हाला धक्का बसेल

Shocking secrets : हा फोटो साधा नाही.... याचं सत्य जाणून तुम्हाला धक्का बसेल

व्हायरल फोटो

व्हायरल फोटो

तुम्हाला हे ऐकून नक्कीच धक्का बसला असणार. पण या फोटो मागचं सत्य तर आणखी धक्कादायक. आता तुम्ही विचार कराल या मुलीचा मृत्यू झालाय की ती भूत आहे?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 22 जानेवारी : सोशल मीडियावर सध्या काही फोटो व्हायरल झाले आहे, या फोटोमधील मुली पार्टी करताना दिसत आहेत. पण आम्ही जेव्हा तुम्हाला या फोटोचं सत्य सांगू तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हो, कारण या फोटोमध्ये दिसणारी मुलगी या जगात अस्तित्वातच नाही. तुम्हाला हे ऐकून नक्कीच धक्का बसला असणार. पण या फोटो मागचं सत्य तर आणखी धक्कादायक. आता तुम्ही विचार कराल या मुलीचा मृत्यू झालाय की ती भूत आहे? हे ही पाहा : ती पडली, सरकली आणि अचानक गायब झाली… रस्ता अपघाताचा ‘हा’ व्हिडीओ ठरला चर्चेचा विषय तर असं काही नाही, ही तरुणी भूत नाही तर ती AI द्वारे तयार केलेली एक प्रतिभा आहे. जी अस्तित्वात नाही. आता आपण याला आणखी नीट समजून घेऊ. AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या मदतीने हे फोटो तयार केले गेले आहे. हे AI अशा लोकांचा फोटो जनरेट करते, जे लोक या जगात कुठेच नाहीत. म्हणजेच हे फेक फोटो आहेत. @mileszim नावाच्या युजरने ट्विटरवर हे फोटो शेअर केले आहेत. ज्यांच्यासोबत कॅप्शन लिहिले आहे की यातील एकही चित्र खरं नाही, ते सर्व AI च्या मदतीने बनवले गेले आहेत. विज्ञान प्रगती करत चाललं आहे आणि ही एक चांगली गोष्ट आहे. पण प्रत्येक नाण्याप्रमाणे याला देखील दोन बाजू आहेत. सायन्सचा आपल्याला जितका फायदा होतो तितकाच त्याचा तोटा देखील आहे. कारण सायन्ससोबत गुन्हेगार देखील हायटेक झाले आहेत. ज्यामुळे ते वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करुन लोकांची फसवणूक करतात. आता हेच पाहा ना जेव्हा पासून इंटरनेटचा वापर वाढला आहे आणि डिजिटल पद्धतींचा वापर वाढला आहे, तेव्हा पासून सर्वसामान्यांना गंडा घालण्याचा प्रकार देखील वाढला आहे.

जाहिरात

तंत्रज्ञानाच्या या युगात आजकाल लोकांना सुंदर मुलींचे व्हिडिओ कॉल येत आहेत. व्हिडीओ कॉल दरम्यान, मुली स्क्रीनवर अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. त्यांना पाहून काही लोक देखील अश्लिल कृत्य करु लागतात. त्याचं हे कृत्य कॅमेरामध्ये कैद केलं जातं आणि मग त्याच्या मदतीने या लोकांकडून धमकावून पैशांची मागणी केली जाते. अशा प्रकारे लोकांना फसवलं जातं. आता अशा डिजिटल फ्रॉड किंवा सायबर फसवणुकीच्या प्रकरणांबद्दल सावधगिरी बाळगताना, तुम्हाला आता या AI संबंधीत गोष्टींपासून देखील सावध राहावं लागणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

आता यात फसवणूकीची गोष्ट अशी की अशा फोटोंचा वापर करुन लोक फ्रोड करतात. ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमच्याशी कनेक्ट होतात आणि फोटो पाहून आपण देखील त्यांच्यावर विश्वास ठेवतो. पण अशा पद्धतीने तुमच्यासोबत धोका होत आहे. कारण जर तो फोटो घेऊन तुम्ही पोलिसात तक्रार करायला गेलात, तर पोलीस त्या व्यक्तीला शोधू शकणार नाही कारण ती व्यक्ती अस्तित्वातच नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात