नवी दिल्ली, 17 सप्टेंबर: सध्याचा जमाना दिखाऊगिरीचा आहे. अनेक जण सोशल मीडियावर अपडेटेड राहण्यासाठी नव्याने येत असलेले वेगवेगळे ट्रेंड्स फॉलो करत राहतात. काही ट्रेंड्स मजेदार असतात; मात्र काही ट्रेंड्स खूपच खतरनाक आणि धोकादायक असू शकतात. जगभरात सध्या एक विचित्र
DIY Trend सध्या स्त्रियांमध्ये लोकप्रिय होत आहे.
TikTok या सोशल मीडिया साइटवर गेल्या काही दिवसांत एक हा घातक ट्रेंड व्हायरल झाला (Viral Trend) आहे. त्यात महिला (W
omen Removing Contraceptive Coils) स्वतःच आपल्या हातांनी काँट्रासेप्टिव्ह कॉइल
(Contraceptive Coil) काढताना दिसून येत आहेत. कॉपर टी असा हाताने ओढून काढणं घातक आहे. ते जिवावर बेतू शकतं, असा इशारा डॉक्टर्स देत आहे.
डॉक्टर्सनी म्हटलं आहे, की असं करणं शरीरासाठी धोकादायक आहे. काँट्रासेप्टिव्ह कॉइलला कॉपर टी (
Copper T) असं म्हटलं जातं. ते एक गर्भनिरोधक साधन आहे. व्हायरल झालेल्या ट्रेंडमध्ये सहभागी झालेल्या महिला आपल्या गुप्तांगात (Private Part) स्वतःच हात घालून कॉपर टी (Copper T) काढत आहेत. डॉक्टर म्हणतात, की हे घातक आहे. यामुळे रक्तस्राव आणि वेदना होऊ शकतात. कॉपर टी बसवलेली असेल आणि ती काढायची असेल, तर डॉक्टरांकडेच जावं, स्वतः ती काढू नये, काढण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन डॉक्टर्सनी केलं आहे. नाही तर या ट्रेंडच्या नादात महिलांना आपलं गर्भाशयही गमवावं लागू शकतं, असंही डॉक्टर्सनी म्हटलं आहे.
@mikkiegallgher या टिकटॉकरने (TikTok) या ट्रेंडची सुरुवात केली होती. टिकटॉकवर तिचे 25 हजार फॉलोअर्स आहेत. सर्वांत आधी मिक्कीनेच अशा प्रकारचा व्हिडिओ तयार केला होता. मिक्की अमेरिकेची नागरिक असून, आता आयर्लंडमध्ये स्थायिक झाली आहे. मिक्कीने आपल्या व्हिडिओत हात गुप्तांगात घालून केवळ दोन मिनिटांमध्ये कॉपर टी काढून दाखवलं. हा व्हिडिओ व्हायरल झाला.
Mission Inspiration: चार सामान्य नागरिक अंतराळ सफरीवर, पाहा PHOTOs
त्यानंतर आणखीही अनेक महिलांनी हे ट्राय केलं आणि त्याचा ट्रेंड व्हायरल झाला. कारण अनेक महिलांनी हा प्रयोग करून पाहिला, त्याचे व्हिडिओ शेअर केले. हे पाहून डॉक्टर्सनी चिंता व्यक्त केली.

न्यूयॉर्कमधल्या एका डॉक्टरनी सांगितलं, की कॉपर टी काढण्यासाठी डॉक्टर्स योग्य उपकरणाचा वापर करतात. त्यासाठी थोडा जोर लावावा लागतो; मात्र तो जोर किती लावायचा याचा नेमका अंदाज नसेल, तर ते धोकादायक ठरू शकतं.
Depression मुळे त्रस्त आहात; तर 'या' पाच आयुर्वेदिक टिप्स करा फॉलो
वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात, की स्वतःच कॉपर टी काढताना काही चूक झाली, तर त्याचा विपरीत परिणाम गर्भाशयावर होऊ शकतो. चुकून कॉपर टीऐवजी गर्भाशयाची पिशवी खेचली गेली, तर ती खाली येऊ शकते. म्हणूनच या भलत्या आणि घातक ट्रेंडमध्ये सहभागी होऊ नये, असं आवाहन डॉक्टर्सनी सर्वांना केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.