वॉशिंग्टन, 17 सप्टेंबर : जगातील सर्वात बलाढ्य योद्धा असते आई (Mother). आई आपल्या मुलांसाठी (Mother and children) कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकते (Mother love). वेळप्रसंगी ती आपला जीव देऊन (Mother gives life for kids) आपला मुलांचा जीव वाचवते (Mother saved children). दक्षिण अमेरिकेत (South America) अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. भरसमुद्रात आपल्या मुलांसह अडकलेल्या (Woman stuck in sea with children) आईने स्वतःची लघवी पिऊन मुलांना आपलं दूध पाजलं (Mother Drank own urine and brastfeed children) आणि त्यांचा जीव वाचवला आणि नंतर तिने आपला जीव सोडला. 40 वर्षांची मैरिली चाकोन (Mariely Chacon) आपल्या कुटुंबासह जहाजातून प्रवास करत होती. तिच्यासोबत तिचा नवरा, 6 वर्षांचा एक मुलगा, दोन वर्षांची मुलगी आणि त्यांची आया वेरोनिका (Veronica Martinez) होती. 3 सप्टेंबरला व्हेनुजुएलाहून (Venezuela) टॉर्टुगासाठी (La Tortuga) हे जहाज निघालं. पण कॅरिबिअनमध्ये (Caribbean) भयानक दुर्घटना झाली. हे वाचा - पोटच्या गोळ्यासाठी आईने स्वीकारलं अपंगत्व; स्वतःचा पाय कापून दिला बाळाला जन्म जहाज तुटलं आणि डुबू लागलं. जहाजाचा काही भाग आणि त्यातील फ्रिज समुद्रात तरंगत राहिला. या दुर्घटनेत मॅरिली, तिची मुलं आणि आया वाचले. जहाजाच्या तुटलेल्या भागाच्या मदतीने ते तरंगत राहिले. जीव तर वाचला पण पोटात अन्न नाही, प्यायला पाणी नाही. मुलंही भुकेने व्याकूळ झाले होती. आपल्या मुलांचा आपल्या डोळ्यादेखत जीव जाताना एक कशी पाहू शकते. शेवटी ती स्वत:चीच लघवी प्यायली. जेणेकरून तिच्या शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये. लघवी पिऊन तिने आपल्या मुलांना ब्रेस्टफिंडिंग केलं आणि त्यांचं पोट भरलं. चार दिवसांनंतर रेस्क्यू टीम त्यांच्यापर्यंत पोहोचली. तोपर्यंतच मॅरिलीचा मृत्यू झाला होता. तिचे मुलं आणि त्यांची आया जिवंत होती, पण ते गंभीर अवस्थेत होते. बचाव पथकाने सांगितल्यानुसार ते तिथं पोहोचण्याच्या काही तास आधीच आईचा डिहायड्रेशनमुळे म्हणजे शरीरात पाणी नसल्याने मृत्यू झाला. दोन्ही मुलं आणि आयाच्या शरीरातही पाणी नव्हतं. उन्हामुळे त्यांच्या शरीराची त्वचा अक्षरशः जळाली होती. वॅरोनिका स्वतःचा जीव वाचवण्यासाठी फ्रिजच्या आत गेली होती. दोन्ही मुलं आईच्या मृतदेहावरच होती. हे वाचा - VIDEO - चिमुकल्या हाती रिक्षाचं स्टेअरिंग! अंध आई-बाबांसाठी 8 वर्षांचा गोपाल बनला श्रावणबाळ व्हेनुजुएला नॅशनल मरीटाइम अथॉरिटीने दिलेल्या माहितीनुसार जहाजावर एकूण नऊ प्रवासी होते. 7 सप्टेंबरला 4 जणांना रेस्क्यू करण्यात आलं. आणखी पाच जण बेपत्ता आहेत. ज्यात मॅरिलीचा नवराही आहे.
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.