व्हिडीओत पाहू शकता, नवरी पूर्ण तयार झाली आहे. तिने दागिने घातले आहेत आणि सुंदर असा लेहंगाही घातला आहे. पण अशी तयार होऊन ती एखाद्या बाहुलीसारखी किंवा इतर नवरीसारखी लाजत मुरडत किंवा स्वतःला आरशात पाहत बसली नाही तर तिने आपले दोन्ही हात जमिनीवर टेकवले आणि पुशअप्स मारायला सुरुवात केली. हे वाचा - लग्नात नवरीची धमाकेदार एन्ट्री; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल 'क्या बात है' नटूनथटून आपल्याच लग्नाच्या दिवशी नवरीने पुशअप्स मारल्या. त्यातही विशेष म्हणजे लग्नाचा लेहंगा म्हटला की तो इतका जड असतो की सावरत साधं चालणंही शक्य होत नाही. पण याच लेहंग्यावर ही नवरी पुशअप्स मारताना दिसली. त्यामुळे तिचं जास्तच कौतुक वाटतं आहे. हे वाचा - VIDEO - अरे हिला आवरा! कॅमेरा दिसताच सुरू झाला नवरीचा नखरा फिटनेस फ्रिक नवरीचा हा हटके अंदाच सर्वांना चांगलाच पसंतीच पडत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride, Fitness, Viral, Viral videos, Wedding video