नवी दिल्ली 26 फेब्रुवारी : समुद्राच्या वाढत्या पाण्यामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. अनेक शहरं बुडाण्याचीही परिस्थिती निर्माण झाली आहे. अलीकडेच, अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने आपल्या अहवालात म्हटलं होतं की अमेरिकेभोवती समुद्राची पातळी गेल्या 100 वर्षात जेवढी वाढलेली नव्हती, त्यापेक्षा जास्त पुढील 30 वर्षांत वाढेल. मात्र याचवेळी जगातील एका देशात समुद्राचं पाणी ऐतिहासिकदृष्ट्या कमी होत आहे. हे अचानक का घडलं? याचं शास्त्रज्ञांनाही आश्चर्य वाटतं. आम्ही माल्टाबद्दल बोलत आहोत. Diche Vale च्या अहवालानुसार, माल्टा आणि गोझोच्या किनारपट्टीलगतचे समुद्राचे पाणी विक्रमी पातळीवर खाली गेलं आहे. यात जानेवारीपासून सुमारे 50 सेंटीमीटरने घट झाली आहे. पाण्याअभावी समुद्रकिनारा लांब आणि मोठा झाला आहे. समुद्रकिनारा लांब आणि रुंद झाला आहे. पूर्वी समुद्राच्या पृष्ठभागाखाली असलेले खडक आता दिसू लागले आहेत. लोक संभ्रमात आहेत. 50 सें.मी. पाणी गेलं कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोक विचारात पडले आहेत, की हे काय चाललं आहे? कुत्रे का रडतात? खरं कारण ऐकाल तर विश्वास बसणार नाही तज्ञांच्या मते, आतापर्यंत सरासरी 15 सेमीने घट नोंदवली गेली होती. मार्चमध्ये इथे सर्वात कमी पाणी असायचं तर नोव्हेंबरमध्ये थोडीच घट होत असे. मात्र यावेळी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्येच अशी परिस्थिती दिसून येत आहे. ऑक्टोबर 1992 ते मार्च 1993 या कालावधीत 40 सें.मी.ची सर्वात कमी घट नोंदवली गेली होती, परंतु सध्या जगभरात पाण्याची पातळी वाढत असताना ही घट शास्त्रज्ञांनाही आश्चर्यचकित करणारी आहे. हे सर्वही तेव्हा घडत आहे, जेव्हा येथे हिवाळा सुरू आहे.. माल्टा कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथील समुद्र विज्ञानाचे प्राध्यापक आल्डो ड्रॅगो यांनी त्सुनामी ‘सिद्धांत’ आणि अलीकडील भूकंपाचं उदाहरण देत काही गोष्टी स्पष्ट केल्या. ते म्हणाले की, पृथ्वीवर काही बदल होत आहेत. त्यामुळेच या असामान्य घटना दिसून येत आहेत. मात्र, चिंतेचं काही नाही, समुद्राच्या पाण्याची पातळी पूर्वीच्या स्थितीत येईल, असं त्यांचं म्हणणं आहे. उन्हाळ्यातही पाण्याची पातळी वाढतच राहणार आहे. गेल्या 100 वर्षांत जागतिक तापमानात सुमारे 1 अंश सेल्सिअस वाढ झाली आहे. त्यामुळे समुद्राच्या पातळीत ६ ते ८ इंच वाढ झाली आहे. पण NASA चा अंदाज आहे की 2050 पर्यंत ते 12 इंच (30 सेमी) पर्यंत वाढू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.