मुंबई 10 ऑक्टोबर : आपल्याला तर हे माहित आहे की आता वाहातुकीचे नियम मोडल्यावर वाहानाचं चलान ऑनलाईन कापलं जाणार, ज्याचं आपल्याला ऑनलाईनचं चलान भरावं लागतं. परंतू एका व्यक्तीने यासाठी असा काही जुगाड केला आहे की, त्याला त्याच्या बाईकचं चलान भरावंच लागणार नाही. आता असं बोलल्यानंतर तुमच्या मनात नक्कीच उत्सुक्ता वाढली असणार की नक्की ही भानगड तरी काय आहे? हे कसं शक्य आहे? चला जाणून घेऊ. खरंतर या व्यक्तीने चुकीच्या मार्गाने हा जुगाड केला. ज्याचा खुलासा एका व्यक्तीने ट्वीटरवर केला. त्याने सांगितले की, स्कूटीने वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल त्याला अनेक चलान त्याला आले आहेत. परंतू ती स्कूटी त्याच्या मालकीची नाही. त्यांच्याकडे एक वाहन आहे ज्याचा नोंदणी क्रमांक आणि स्कूटीचा क्रमांक सारखाच दिसतो. त्यामुळे स्कूटीची सर्व चालान त्याच्या कार नंबरवर जारी केली जात असल्याचा दावा त्या व्यक्तीने केला. याबाबत तीन वेळा तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र कारवाई झाली नाही. हे ही वाचा : घरी सुखरुप जाता यावं यासाठी तरुणानं GPS ची मदत घेतली, पण Map नं त्याला मृत्युच्या रस्त्यावर नेलं 6 ऑक्टोबर रोजी एका स्कूटी स्वाराचे दोन फोटो शेअर करताना ते म्हणाले - ‘‘ही व्यक्ती दररोज वाहतूक नियमांचे उल्लंघन करते. त्याने आपल्या नंबर प्लेटमध्ये अशा प्रकारे बदल केला आहे की E हे अक्षर F सारखे दिसते. प्रत्यक्षात त्याच्या दुचाकीचा क्रमांक MH02EJ0759 असा आहे.’’ ‘‘पण या फोटोत तो MH02FJ0759 हा क्रमांक असा दिसत आहे, ज्यामुळे त्याची सर्व चालान माझ्या चारचाकीच्या नंबरवर येतो. मी तक्रार करून थकलो आहे.’’ या व्यक्तीला जेव्हा मुंबई ट्रॅफिक पोलिसांना ट्विट करून तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला गेला, तेव्हा त्या व्यक्तीने लिहिले - मी याआधीही तीन वेळा 3 चालानची तक्रार केली आहे. पण त्यावर काहीही ऍक्शन घेतली जात नाही.
हे ही वाचा : नव्या कोऱ्या कारची ग्रँड एन्ट्री, Video पाहून तुम्हाल हसावं की मालकासाठी दु:खं व्यक्त करावं हेच कळणार नाही तो दर महिन्याला वाहतुकीचे नियम तोडतो आणि मी दर महिन्याला एमटीपी ऍप तपासतो आणि तक्रार करतो. त्या व्यक्तीने मुंबई पोलिस आणि मुंबई वाहतूक पोलिसांना टॅग केले आणि अशी बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार नाही का, असा सवाल केला. त्याच वेळी, वापरकर्त्यांनी देखील व्यक्तीच्या मुद्द्याचे समर्थन केले. काहींनी त्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हावी असे लिहिले. त्याचबरोबर वाहनाच्या क्रमांकाशी छेडछाड करून त्या व्यक्तीलाही धडा शिकवावा, असे देखील सांगितले आहे.

)







