मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मेहुणी जोमात दाजी कोमात! नवरीबाईच्या बहिणींचा प्रताप पाहून नवरदेवाला लग्नातच फुटला घाम

मेहुणी जोमात दाजी कोमात! नवरीबाईच्या बहिणींचा प्रताप पाहून नवरदेवाला लग्नातच फुटला घाम

दाजीसाठी मेहुणींनी रचलं चक्रव्यूह.

दाजीसाठी मेहुणींनी रचलं चक्रव्यूह.

दाजीसाठी मेहुणींनी रचलं चक्रव्यूह.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 18 डिसेंबर : लग्नात (Wedding video) नवरीच्या बहिणी नवरदेवावर टपलेल्या असतात (Jija saali video). दाजींचा खिसा रिकामा करण्याची एक संधी त्या सोडत नाही. लग्नात असे बरेच खेळ असतात ज्यात मेहुणी दाजीकडून पैसे घेतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात मेहुणींनी दाजींकडून पैसे काढून घेण्यासाठी जी शक्कल लढवली त्याला तोडच नाही.

नवरीबाईच्या बहिणी इतक्या स्मार्ट निघाल्या की त्यांचा  प्रताप पाहून नवरदेवाला लग्नात घामच फुटला आहे. त्याने अक्षरशः डोक्यावर हात मारला आहे. मेहुणींनी अशा पद्धतीने चक्रव्यूह रचलं की काही केलं तरी नवरदेवाची त्यांच्या तावडीतून हातून सुटका शक्यच नाही. आता असं नेमकं या मेहुणींनी नेमकं काय केलं ते तुम्हीच पाहा.

दुल्हनिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता, नवरा-नवरी एकमेकांशेजारी बसले आहेत. त्यांच्यासमोर नवरीच्या बहिणी बसल्या आहेत. नवरीच्या हातात एक व्हील आहे तर एका मेहुणीच्या हातात दुधाचा ग्लास.

हे वाचा - तो हट्ट पडला महागात; नवरदेवाची लग्नमंडपातच लाथा-बुक्क्यांनी धुलाई

ही 'दूध पिलाई रसम' सुरू आहे. ज्यात मेहुणी नवरदेवाला दूध देतात आणि त्याबदल्यात त्यांच्याकडून पैसे घेतात. अगदी जसे बूट चोरीसाठी घेतले जातात तसेच. पण यावेळी आपण अनेकदा पाहिलं आहे की दाजी-मेहुणीमध्ये वाद होतात. मेहुणी एका रकमेवर ठाम असते तर दाजी रक्कम कमी करण्यासाठी विनवणी करत असतो. पण इथं मात्र नवरदेवाकडे तसा कोणताच चान्स नाही. खरंतर हे त्याच्या नशीबावर अवलंबून आहे असं म्हणण्यास हरकत नाही.

कारण इथं मेहुणींनी नवरदेवाकडून दूध पिलाईची रक्कम घेण्यासाठी एक खास व्हिल तयार केलं आहे. ज्यात बऱ्याच रक्कम लिहिली आहेत आणि एक छोटासा बाण आहे. नवरदेवाला हे चक्र फिरवायचं आहे. जो आकडा त्या बाणाजवळ येऊन थांबेल तितकी रक्कम नवरदेवाला द्यावी लागेल. त्यामुळे नवरदेव हळूच हे चक्र फिरवतो जेणेकरून कमीत कमी रक्कम द्यावी लागेल.

हे वाचा - हनिमूनचं प्लॅनिंग मित्रांना सांगून फसला तरूण; पुढे घडलं भलतंच

बाणाजवळ एक आकडा येतो आणि त्यानंतर नवरीबाई आपल्या नवरदेवाची मदत करण्याचा प्रयत्न करते. ते व्हील हाताने हलवते आणि कमीत कमी आकड्याकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. पण तिच्या बहिणी तिची चिटिंग पकडतात आणि बिच्चारा नवरदेव आपल्या डोक्याला हातच लावतो. इतकी रक्कम पाहून त्याला घामच फुटतो.

First published:

Tags: Bridegroom, Wedding, Wedding video