• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • लाखो मोजायला तयार असाल तरच हे द्राक्षे विकत घेण्याचा करा विचार; किंमत ऐकून व्हाल थक्क, वाचा खासियत

लाखो मोजायला तयार असाल तरच हे द्राक्षे विकत घेण्याचा करा विचार; किंमत ऐकून व्हाल थक्क, वाचा खासियत

रुबी रोमन द्राक्षे (Ruby Roman grapes) असं या द्राक्षांचं नाव आहे. हे पाहायलाच इतके सुंदर असतात की या फळाची किंमत भारतात सुमारे 750,000 रुपये इतकी आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 06 जुलै: उष्णकटिबंधीय देशांमध्ये फळे फारच स्वस्त असतात कारण तेथील हवामान उत्कृष्ट असतं. एवढंच नव्हे तर अशा देशांमध्ये परवडणार्‍या किंमतीत फळे खरेदी करता येतात. मात्र एक फळ असं आहे, ज्याची किंमत हजारो आणि लाखांमध्ये आहे. द्राक्ष हे फळ तुम्ही बऱ्याचदा खाल्लं असेल. मात्र, आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महाग द्राक्षांबाबत (Most Expensive Variety of Grapes in World) सांगत आहोत. रुबी रोमन द्राक्षे (Ruby Roman grapes) असं या द्राक्षांचं नाव आहे. हे पाहायलाच इतके सुंदर असतात की या फळाची किंमत भारतात सुमारे 750,000 रुपये इतकी आहे. याच्या केवळ एका मण्याची किंमत सुमारे 35 हजार रुपये आहे. उंदरांनाही लागली दारूची चटक? दुकानातील 12 बाटल्या केल्या रिकाम्या अन्... रूबी रोमन द्राक्षे हा अत्यंत दुर्मिळ प्रकार आहे. दरवर्षी या प्रकारच्या द्राक्षांच्या केवळ 2,400 गडांचं उत्पादन घेतलं जातं. अत्यंत साध्या पद्धतीनं याची शेती केली जाते. प्रत्येक द्राक्षाची गुणवत्ता तपासली जाते. यातून जे द्राक्षे निवडले जातात त्यावर सर्टिफिकेशन सेल ठेवलं जातं. हे द्राक्षे विकण्यासाठी कडक नियम आहेत. चालत्या ट्रेनमधून उतरणाऱ्या वृद्धाचा गेला तोल अन्...; पाहा थरकाप उडवणारा VIDEO या प्रत्येक द्राक्षाचं वजन 20 ग्रॅम असतं आणि ते पिंगपाँग बॉलच्या आकाराचे असतात. मात्र, यातील काही द्राक्षे तीन सेमी इतके मोठेही असतात. द्राक्षाची शेती जपानी लक्झरी फळांच्या बाजारात अत्यंत डिमांडिंग आहे. 2008 साली रूबी रोमन द्राक्षाची पहिल्यांदा प्रीमियम द्राक्षाच्या नव्या रुपात सुरुवात झाली. Orissapost.com च्या वृत्तानुसार, सर्वात महागड्या द्राक्षांची निर्मिती करण्यासाठी 14 वर्ष प्रयत्न आणि गुंतवणूक करावी लागली. तेव्हा जाऊन ही शेती करणं शक्य झालं.
  Published by:Kiran Pharate
  First published: