Home /News /viral /

चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धाचा गेला तोल अन्...; थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धाचा गेला तोल अन्...; थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

रेल्वे स्टेशनवरील (Railway Station) काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर आली आहे. हा व्हिडिओ (Viral Video) पाहून तुम्हालाही हा धडा नक्कीच मिळेल, की दुर्घटनेपेक्षा उशिरा झालेला कधीही बरा.

    नवी दिल्ली 06 जुलै: अनेकदा असं म्हटलं जातं, की घराबाहेर पडताच स्वतःची विशेष काळजी घ्या. कारण कधी कोणतं संकट येईल, हे सांगता येत नाही. विशेषतः तुम्ही रेल्वेनं (Train) प्रवास करत असाल तर अधिकच सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं ठरतं. सध्या गाजियाबाद रेल्वे स्टेशनवरील (Railway Station) काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर आली आहे. हा व्हिडिओ (Viral Video) पाहून तुम्हालाही हा धडा नक्कीच मिळेल, की दुर्घटनेपेक्षा उशिरा झालेला कधीही बरा. गाजियाबादमधील (Ghaziabad) या घटनेत चालत्या ट्रेनमधून एक वृद्ध व्यक्ती प्लॅटफॉर्मवर (Platform) उतरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, अचानक या वृद्धाचा तोल गेला आणि ते चालत्या ट्रेनसोबतच पुढे खेचले जाऊ लागले. उंदरांनाही लागली दारूची चटक? दुकानातील 12 बाटल्या केल्या रिकाम्या अन्... सोशल मीडियावर सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, ही घटना घडत असतानाच शेजारीच असलेल्या दोन हेड कॉन्स्टेबलनं हे दृश्य पाहिलं आणि ते या वृद्धाच्या मदतीसाठी धावले. यामुळे, या घटनेत वृद्धाचा जीव वाचला आहे. यानंतर त्यांनी वृद्धाला प्लॅटफॉर्मवर बसवलं. या कामासाठी रेल्वे पोलिसांनी कॉन्स्टेबल त्रिलोक शर्मा आणि श्याम सिंह यांचं कौतुक केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना तेव्हा घडली जेव्हा ट्रेन नंबर 02419 गोमती एक्सप्रेस गाजियाबाद रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर 3 वर पोहोचली. याच ट्रेनमध्ये उतरताना एका वृद्ध व्यक्तीचा तोल गेला. इतक्यात ड्यूटीवर तैनात असलेल्या दोन कॉन्स्टेबलनं या व्यक्तीचा जीव वाचवला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण कॉन्स्टेबलनं दाखवलेल्या प्रसंगावधानाचं कौतुक करत आहेत. पोहता येत नसेल तरी 'या' समुद्रात बिनधास्त घ्या उडी; बुडण्याची शक्यताच नाही हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतात अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं की हे दृश्य अत्यंत भीतीदायक आहे मात्र देवाच्या कृपेनं या व्यक्तीचा जीव वाचला. तर काहींनी वृद्धाचा जीव वाचवणाऱ्या दोन्ही कॉन्स्टेबलचं कौतुक केलं आहे. तर, अनेकांनी म्हटलं, की अशा घटना कोणासोबतही घडू शकतात त्यामुळे रेल्वे स्टेशनसारख्या ठिकाणी आपण विशेष काळजी घ्यायला हवी.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Railway accident, Railway track, Shocking, Shocking video viral

    पुढील बातम्या