नवी दिल्ली 19 मे : गेल्या काही दिवसांपासून रोमँटिक जोडपी रस्त्यावर धोकादायक पद्धतीने बाइक किंवा स्कूटी चालवतानाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. देशातील अनेक भागातून असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक जोडपं स्कूटीवर विचित्र पद्धतीने बसलेलं दिसत आहे. सोशल मीडियावर समोर आलेला व्हिडिओ हा दिल्लीचा असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ कुठला आहे याची अद्याप पुष्टी झालेली नाही. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती वाहनांनी भरलेल्या रस्त्यावर पांढऱ्या रंगाची स्कूटी चालवताना दिसत आहे. त्याची गर्लफ्रेंड त्याच्या मागे बसलेली दिसते. यादरम्यान, असं काही घडतं ज्याने सोशल मीडिया वापरकर्त्यांना गोंधळात टाकलं आहे. बॉयफ्रेंड कोणाशी बोलू नये म्हणून गर्लफ्रेंडनं केलं भयानक कृत्य व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. जो @shalukashyap28 नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना ‘दिल्लीच्या रस्त्यावर इस्क आणि रिस्क’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. व्हिडिओमध्ये मुलगी मुलाच्या मानेवर हात ठेवून बसलेली दिसत आहे. त्यानंतर मुलगाही थोडा मागे सरकतो आणि मुलीच्या गळ्यात हात टाकतो. यानंतर दोघंही अतिशय विचित्र पद्धतीने गाडीवर बसलेले दिसतात.
अशा प्रकारे रस्त्यावर वाहन चालवणं अतिशय धोकादायक आहे. थोडासा तोल गेला तरी अपघात होऊ शकतो. त्यामुळे कोणालाही गंभीर दुखापत होऊ शकते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही बातमी लिहेपर्यंत सोशल मीडियावर 6 लाख 40 हजारांहून अधिक युजर्सनी तो लाईक केला आहे आणि 16 दशलक्षाहून अधिक म्हणजे सुमारे एक कोटी 60 लाख युजर्सनी तो पाहिला आहे. व्हिडिओ पाहून यूजर्स यावर मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.