नवी दिल्ली, 19 मे : जिथे प्रेम तिथे भांडणं ही होतच असतात. मग ते कोणतंही नातं असो. खास करुन बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडमध्ये. आजकाल गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये वाद होण्याचं प्रमाण वाढलं असून ते सोशल मीडियावरही अनेकदा चर्चेचा विषय बनतात. वादानंतर त्यांच्यामध्ये अनेक विचित्र, धक्कादायक, मजेशीर कृत्य झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. यामध्ये आणखी एका घटनेची भर पडली असून यावेळी गर्लफ्रेंडने जेलेसीमध्ये सर्व मर्यादा पार केल्याचं पहायला मिळालं. प्रियकराने दुसऱ्या मुलीशी बोलू नये, फसवणूक करू नये, म्हणून गर्लफ्रेंडने जे केलं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तुम्हीही कधी विचारही केला नसेल की एखादी व्यक्ती आपल्या प्रियकरासोबत असं काही करेल. महिलेनं तिच्या बॉयफ्रेंडला चक्क 3 दिवस कोंडून ठेवलं.
अर्जेंटिनाच्या ला प्लाटा शहरात पोलिसांनी 29 वर्षीय तरुणाला त्याच्या मैत्रिणीच्या घरातून बाहेर काढले. खरंतर दोघेही सहा महिन्यांपूर्वी भेटले होते आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दरम्यान, शनिवारी या दोघांमध्ये वाद झाला. प्रियकर दुसऱ्याच मुलीसोबत बोलत असल्याचा प्रेयसीला संशय आला. मग तिने प्रियकराला एका खोलीत बंद केले. त्याच्या फोनवरून WhatsApp, Facebook, Instagram अनइंस्टॉल केले. त्यामुळे तो कोणाशीही संपर्क साधू शकला नाही. त्याला मारहाणही केली. हेही वाचा - व्हॅम्पायर सारखं दिसण्यासाठी व्यक्तीचं अनोखं धाडस, स्वतःच्याच शरीरसोबत केलं असं काही…. ती व्यक्ती तीन दिवस अडकून पडली. कसा तरी फोन चोरून त्याने मित्राला मेसेज केला. मग पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्याची सुटका केली. ला प्लाटा येथील व्हिला पोनसाटी स्ट्रीटवरील महिलेच्या घरी पोलीस पोहोचले तेव्हा त्यांनी एका बंद खोलीतून मदतीसाठी हताश पुरुष ओरडत असल्याचे ऐकले. पोलिसांना पाहताच त्याचा आवाज कुणाला तरी ऐकू यावा म्हणून तो खूप ओरडत होता. अखेर पोलिसांनी पोहोचून महिलेच्या तावडीतून त्याची सुटका केली. 30 वर्षीय प्रेयसीला अटक करण्यात आली आहे. तिचा छळ केल्याप्रकरणी तिच्यावर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, हे धक्कादायक प्रकरण सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे. यापूर्वीही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या वादाच्या घटना समोर आल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी एकमेकांसोबत धक्कादायक प्रकार केले आहेत.