मराठी बातम्या /बातम्या /Viral /जन्मठेपेची शिक्षा मिळालेल्या आरोपीच्या प्रेमात पडली जज; कॅमेऱ्यात कैद झाला रोमान्स

जन्मठेपेची शिक्षा मिळालेल्या आरोपीच्या प्रेमात पडली जज; कॅमेऱ्यात कैद झाला रोमान्स

जज मारियलने आरोपी क्रिस्टियन बस्टोसला जन्मठेपेची शिक्षा दिली जावू नये, असं मत मांडलं होतं. आता त्यांचा त्याच आरोपीसोबतचा जेलमधील किसिंग व्हिडिओ समोर आला आहे.

जज मारियलने आरोपी क्रिस्टियन बस्टोसला जन्मठेपेची शिक्षा दिली जावू नये, असं मत मांडलं होतं. आता त्यांचा त्याच आरोपीसोबतचा जेलमधील किसिंग व्हिडिओ समोर आला आहे.

जज मारियलने आरोपी क्रिस्टियन बस्टोसला जन्मठेपेची शिक्षा दिली जावू नये, असं मत मांडलं होतं. आता त्यांचा त्याच आरोपीसोबतचा जेलमधील किसिंग व्हिडिओ समोर आला आहे.

नवी दिल्ली 06 जानेवारी : जेलमध्ये एका हत्याऱ्याला किस करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तपासात समोर आलं की महिला जज त्याच पॅनलचा भाग आहे, ज्याने या आरोपीला शिक्षा सुनावली. मात्र, या जजने आरोपीला मिळालेल्या शिक्षेचा विरोध केला होता. ही घटना अर्जेंटिनाची आहे. यात हत्येच्या आरोपात तुरुंगात कैद असलेल्या क्रिस्टियन बस्टोस याच्यासोबत क्रिमिनल जज (Criminal judge) मारियल सुआरेजचा लिप-लॉक व्हिडिओ CCTV मध्ये कैद झाला (Romance of Judge With Criminal). व्हिडिओ समोर आल्यानंतर जजने ही एक अधिकृत भेट होती असं सांगितलं आणि कॅमेऱ्याच्या चुकीच्या अँगलमुळे हे दृश्य असं दिसल्याचा दावा केला.

पत्नीसोबतच्या प्रत्येक भांडणानंतर पती गुपचूप करायचा हे काम; समजताच हादरली महिला

डेली स्टारच्या वृत्तानुसार, जज मारियलने आरोपी क्रिस्टियन बस्टोसला जन्मठेपेची शिक्षा दिली जावू नये, असं मत मांडलं होतं. आता त्याच आरोपीसोबत जेलमधील किसिंग व्हिडिओ समोर आल्यानंतर मारियलचं असं म्हणणं आहे की ती क्रिस्टियनवर एक पुस्तक लिहित असून याचबद्दल बोलण्यासाठी ती तुरुंगात गेली होती. व्हिडिओ त्याच भेटीचा आहे.

आरोपीसोबत रोमान्स करण्याबाबत मारियलाची चौकशी सुरू आहे. CCTV मध्ये कैद व्हिडिओच्या आधारे प्रकरणाचा तपास सुरू आहे. यात जज मारियल कॅमेऱ्याकडे पाठ करून आरोपी क्रिस्टियलच्या जवळ जाताना दिसते. याबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की आपलं बोलणं कोणाला समजू नये यासाठी त्या बोलताना आरोपीच्या इतकं जवळ गेल्या होत्या.

फेक अकाऊंट बनवून बहिणीलाच ओढलं प्रेमाच्या जाळ्यात; 10 वर्षांनी फुटलं बिंग

क्रिस्टियन बस्टोस आपल्या मुलाच्या आणि एका पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येच्या प्रकरणात तुरुंगात आहे. नुकतंच त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तो आपल्या सावत्र मुलाच्या हत्येनंतर फरार झाला होता. पोलीस जेव्हा त्याला पकडण्यासाठी गेले तेव्हा त्याने गोळीबार करत एका पोलिसाची हत्या केली. एका न्यूज वेबसाईटसोबत बोलताना मारियलने म्हटलं की या आरोपीसोबत माझा काहीही भावनात्मक संबंध नाही. मी त्याच्यावर पुस्तक लिहित आहे. आमच्यात कोणतंही वेगळं नातं नाही.

First published:

Tags: Criminal, Romance