मराठी बातम्या /बातम्या /Viral /तंत्रज्ञानाचा आविष्कार; रोबोटने केली अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, डॉक्टरही अवाक

तंत्रज्ञानाचा आविष्कार; रोबोटने केली अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, डॉक्टरही अवाक

या रोबोटने डुकराची यशस्वी लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया केली आहे. मोठी गोष्ट म्हणजे या ऑपरेशनमध्ये त्याला कोणत्याही माणसाने थेट मदत केलेली नाही.

या रोबोटने डुकराची यशस्वी लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया केली आहे. मोठी गोष्ट म्हणजे या ऑपरेशनमध्ये त्याला कोणत्याही माणसाने थेट मदत केलेली नाही.

या रोबोटने डुकराची यशस्वी लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया केली आहे. मोठी गोष्ट म्हणजे या ऑपरेशनमध्ये त्याला कोणत्याही माणसाने थेट मदत केलेली नाही.

नवी दिल्ली 28 जानेवारी : तंत्रज्ञान जसजसं विकसित होत आहे, तसतशी मानवापुढील आव्हानेही वाढत आहेत. काहीवेळा यंत्रे मानवांना अशा गोष्टी करण्यास मदत करतात ज्या करणं मानवांसाठी खूप कठीण असतं. नुकतीच एक अतिशय आश्चर्यकारक घटना घडली आहे, ज्याने सर्वांनाच हैराण केलं आहे. यात एका रोबोटने डुकराचं यशस्वीपणे ऑपरेशन केलं आहे (Robot Performs Surgery on Pig). त्यानंतर डॉक्टरांना असं वाटू लागलं आहे की आता त्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे.

'हा माझा सिक्रेट मसाला'; वेटरने जेवणात मिसळली किळसवाणी गोष्ट, वाचून बसेल धक्का

अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी बनवलेल्या स्मार्ट टिश्यू ऑटोनॉमस रोबोट अर्थात STAR ने नुकताच एक चमत्कार केला आहे. या रोबोटने डुकराची यशस्वी लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया केली आहे. मोठी गोष्ट म्हणजे या ऑपरेशनमध्ये त्याला कोणत्याही माणसाने थेट मदत केलेली नाही. रोबोटिक्सच्या दिशेने या ऑपरेशनकडं मोठं यश म्हणून पाहिलं जात आहे.

डेली स्टार वेबसाइटच्या वृत्तानुसार, ही शस्त्रक्रिया खूपच गुंतागुंतीची होती, ज्यामध्ये डुकराच्या आतड्याचे दोन कोपरे एकमेकांना जोडावे लागले. रिपोर्टनुसार ही शस्त्रक्रिया डॉक्टरांसाठी खूपच गुंतागुंतीची आहे. याचा धोकाही खूप जास्त असतो कारण शस्त्रक्रियेदरम्यान शल्यचिकित्सकाचा हात हालला किंवा चुकीच्या ठिकाणी टाके टाकले गेले तर जीवाचा मृत्यूही होऊ शकतो. या प्रकारच्या ऑपरेशनमध्ये यंत्रमानव वापरण्याचा फायदा म्हणजे तीच क्रिया पुन्हा पुन्हा केली तरी त्यांचे हात हालत नाहीत. आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि रोबोटिक उपकरणांचा वापर करून हे ऑपरेशन केलं जातं.

नाक-कान कापून राक्षस बनला, चेहरा खराब करण्यासाठी खर्च केले 30 लाख रुपये!

या प्रोजेक्टमध्ये सहभागी असलेले डॉक्टर क्रिगर यांनी आपल्या निवेदनात सांगितलं की, स्टार रोबोटने ही संपूर्ण प्रक्रिया 4 प्राण्यांवर अगदी सहजपणे पार पाडली आणि या प्रक्रियेचे परिणाम मानवाने केलेल्या शस्त्रक्रियेपेक्षा चांगले असल्याचं सिद्ध झालं आहे. या प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी अजूनही मानवांच्या सुपरव्हिजनची आवश्यकता आहे. आता मानवी मदतीशिवाय ते ऑपरेशन करू शकतील यासाठी रोबोट्स पूर्णपणे सक्षम बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अनेक डॉक्टरांचं म्हणणं आहे की यामुळे त्यांची नोकरी आणि अनेक वर्ष मेडिकल कॉलेजमध्ये जात घेतलेलं ज्ञान धोक्यात येत आहे.

First published:
top videos

    Tags: Robot, Surgery