Home /News /lifestyle /

नाक-कान कापून राक्षस बनला, चेहरा खराब करण्यासाठी खर्च केले 30 लाख रुपये!

नाक-कान कापून राक्षस बनला, चेहरा खराब करण्यासाठी खर्च केले 30 लाख रुपये!

व्हेनेझुएलामधील (Venezuela News) एका व्यक्तीने स्वत:चा चेहरा विद्रुप करून घेतलाय. (Tattoo artist turns himself Devil) हेन्री रॉड्रिग्ज (Henry Rodriguez) असं या व्यक्तीचं नाव आहे.

मुंबई, 28 जानेवारी : अनेक जण आपण सुंदर दिसावं यासाठी हजारो-लाखो रुपये खर्च करुन शस्त्रक्रिया करतात. मात्र, तुम्हाला हे वाचून आश्चर्य होईल की जगात असंही कुणी आहे ज्याने आपला चेहरा विद्रुप दिसावा यासाठी पैसे खर्च केले आहेत. व्हेनेझुएलामधील (Venezuela News) एका व्यक्तीने अशाच प्रकारे स्वत:चा चेहरा विद्रुप करून घेतलाय. (Tattoo artist turns himself Devil) हेन्री रॉड्रिग्ज (Henry Rodriguez) असं या व्यक्तीचं नाव आहे. तो टॅटू आर्टिस्ट (Tattoo Artist) आहे. हेन्रीने मार्व्हल कॉमिक्समधील सुपर व्हिलन ‘रेड स्कल’सारखं (Super Villain Red Skull) दिसण्यासाठी स्वतःचा चेहराच बदलला. (Tattoo artist turns himself Satan) अनेक वर्ष बॉडी मॉडिफिकेशन (Body Modification) केल्यानंतर हेन्रीने स्वत:चा चेहरा राक्षसासारखा करून घेतला. त्याचा चेहरा इतका बदलला की त्याच्या जवळच्या मंडळींना हेन्रीचा मूळ चेहराच आता आठवत नाही. त्याने नाक आणि कान कापून तो विद्रुप केल्याने सगळ्यांना त्याची भीतीच वाटते. खर्च केले तब्बल 30 लाख रुपये डेली स्टारने (Daily Star) दिलेल्या अहवालानुसार, टॅटू आर्टिस्ट हेन्री रॉड्रिग्ज (Henry Rodriguez) याला बालपणापासूनच रेड स्कल नावाच्या सुपर व्हिलनची भूमिका फारच आवडत होती. याचमुळे त्याने आपल्या शरीरात त्याप्रकारे बदल घडवायची सुरुवात केली. हेन्री 42 वर्षांचा असून त्याला एक मुलगाही आहे. त्याने आपल्या या आगळ्यावेगळ्या इच्छेसाठी तब्बल 30 लाख रुपये खर्च केले. यानंतर त्याचा चेहरा भयावह झाला. हेन्रीचं म्हणणं आहे की त्याला राक्षसी स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व फार आवडतं, याचमुळे त्याने हा निर्णय घेतला. 2012 मध्ये घेतला निर्णय हेन्रीने स्वत:चा चेहरा बदलण्याचा निर्णय 2012मध्ये घेतला होता. यासाठी त्याला अनेक शारीरिक आणि मानसिक चाचण्या द्याव्या लागल्या. तब्बल 130 तास ही शस्त्रक्रिया चालली. यानंतर त्याला असा विचित्र लूक मिळाला. त्याने आपलं नाक आणि कान कापून घेतले आहेत. तसंच त्याच्या डोळ्यांच्या आतदेखील काळी शाई टाकण्यात आली आहे. त्याने आपल्या कपाळावर प्रत्यारोपण (Transplant) केल्यानंतर तिथं विचित्र असे फुगे तयार झाले आहेत. त्याने आपल्या भुवयांवरदेखील प्रत्यारोपण केलं आहे. इतकंच नाही तर त्याने आपली जीभदेखील दोन भागांमध्ये कापली आहे. विशेष म्हणजे हेन्री नावाचा हा माणूस आपल्या चेहऱ्यावर आणखी प्रयोग करायला पूर्णपणे तयार आहे.
First published:

पुढील बातम्या