मराठी बातम्या /बातम्या /Viral /अरे चोरा! साथीदारांची नजर चुकवत चोरट्याने केलं असं काही की...; VIDEO VIRAL

अरे चोरा! साथीदारांची नजर चुकवत चोरट्याने केलं असं काही की...; VIDEO VIRAL

अजब चोराचा गजब प्रताप

अजब चोराचा गजब प्रताप

चोराने चोरी करताना साथीदारांच्या पाठीमागून जे केलं ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Rajasthan, India

अजमेर, 21 जानेवारी : चोरीचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात चोराने आपल्या साथीदार चोरांनाही फसवलं आहे. साथीदारांची नजर चुकवून या चोराने असं काही केलं की त्याच्या साथीदारांना त्याची खबरही लागली नाही. पण  त्याचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. राजस्थानच्या बाडमेरमधील हे चोरीचं प्रकरण आहे.

बाडमेरमधील एका एका दारूच्या दुकानात चोरी झाली. दुकानाचे मालक नगेंद्र सिंहने सांगितलं की, रात्री दुकान बंद करून तो घरी गेला. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या काही स्थानिक लोकांनी मला फोन करून दुकानाचं शटर उघडं असल्याचं सांगितलं. मी पाहिलं तर शटर तुटलेलं होतं. दुकानाच्या गल्ल्यातील दोन दिवसांची रक्कमही गायब होती.

हे वाचा - बापरे! UFO की आणखी काही? VIRAL VIDEO पाहून सर्वांना भरली धडकी; इथं पाहा त्याचं सत्य

दुकानदाराने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 जानेवारीची ही घटना आहे.  रात्री दोनच्या सुमारास ही चोरी झाल्याचं समजलं. कारमधून आलेल्या तीन चोरट्यांनी दुकानावर डल्ला मारला.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक चोर दुकानाच्या आत आहे आणि दोघं बाहेर आहेत. दुकानाच्या आत असलेला चोर एकएक दारूच्या बाटल्या घेऊन त्या दुकानाबाहेरील आपल्या साथीदारांना देतो आहे. त्यानंतर तो मध्येच दुकानाचा गल्ला उघडून पाहतो आणि त्यातील काही पैसेही साथीदारांना देतो. त्यानंतर जसे साथीदार आपल्याजवळ नाहीत, आपल्याला पाहत नाही आहेत हे पाहतो आणि पुन्हा गल्ला खोलून त्यातील नोटांचं बंडल आपल्या अंडरविअरमध्ये कोंबतो. परत थोड्या वेळाने तो आणखी काही पैसे काढून आपल्या अंडरविअरमध्ये टाकतो.

चोरट्याच्या या प्रतापाबाबत दुकानाबाहेर उभ्या असलेल्या त्याच्या साथीदारांनाही काहीच माहिती नव्हतं. पण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे सर्व कैद झालं.

" isDesktop="true" id="818238" >

दरम्यान या चोरांचा अद्याप तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

First published:

Tags: Theif, Viral, Viral videos