नवी दिल्ली 12 फेब्रुवारी : चोरीच्या घटनांमुळे लोकांमध्ये एक प्रकारची भीती निर्माण होते. अनेकदा चोरीच्या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Robbery Video) होत असतात. चोरी करताना चोर आपलं डोकं आणि चपळपणाचा वापर करून समोरच्याला लुटतात. मात्र अनेकदा त्यांचा हा प्रयत्न फसतो. सोशल मीडियावर सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. यात चोरी करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांसोबत जे घडलं, ते खरंच हैराण करणारं आहे. यात दिसतं की चोरांचा डाव पूर्णपणे फसतो आणि त्यांना आपलाच जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागतो. बोटीतून पडला तरुण तो थेट पाणघोड्याच्या जबड्यात आणि…; अंगावर काटा आणणारी घटना व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दोन लोक एका दुचाकीवर चाललेले दिसतात. इतक्यात त्यांच्या मागून आणखी दोघं एक दुचाकीवर येताना दिसतात. हे युवक समोर असलेल्या दुचाकीजवळ जाऊन थांबतात. मात्र, इतक्यात असं काही घडतं ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. हे दोन युवक बंदुकीचा धाक दाखवत समोरच्या युवकाची दुचाकी लुटण्याचा प्रयत्न करतात.
हे पाहून दुचाकीवरील दोघंही खाली उतरून मागे निघून जातात. यानंतर व्हिडिओमध्ये अनपेक्षित घडतं. बाईकवरुन उतरून मागे जातानाच यातील एक व्यक्ती आपल्याकडील बंदूक बाहेर काढतो आणि चोरांकडे जाऊ लागतो. व्यक्तीच्या हातात बंदूक पाहून चोर घाबरतात आणि इकडेतिकडे पळू लागतात. या व्यक्तीचं धाडस पाहून चोर आपलीच दुचाकी सोडून पळ काढतात.
VIDEO - पॅराग्लाइडरची मदत करताना हवेत उडाला तरुण; उंचावर जाताच हात सुटला आणि…
दुचाकीस्वाराच्या धाडसामुळे चोरांचा उद्देश फसला. व्हायरल होणारा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून लोक या व्यक्तीच्या धाडसाचं कौतुक करत आहेत. आतापर्यंत 38 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला असून हजारो लोकांनी लाईकही केला आहे.