पोलिसांपासून वाचण्यासाठी तब्बल 22व्या मजल्यावर लटकला चोर; पुढे नेमकं काय झालं पाहा VIRAL VIDEO

पोलिसांपासून वाचण्यासाठी तब्बल 22व्या मजल्यावर लटकला चोर; पुढे नेमकं काय झालं पाहा VIRAL VIDEO

पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकून चोराने पळण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने ना इमारतीच्या पायऱ्यांचा ना लिफ्टचा वापर केला, तर बिल्डिंगच्या बाहेरील भागातून पळण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

बिजिंग, 7 नोव्हेंबर : पोलिसांपासून वाचण्यासाठी प्रत्येक आरोपी अनेक प्रकारे प्रयत्न करतो. चीनमधील एका चोराने असाच पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न केला. पोलिसांपासून वाचण्यासाठी तो तब्बल 22व्या मजल्यावर लटकला. हा प्रकार हुनान प्रांतातील जियांग शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 24 मार्च रोजी एक चोर स्थानिक दुकानात चाकू घेऊन शिरला आणि लूटमार करू लागला. यावेळी त्याने दुकानातून एटीएम चोरलं आणि खात्यातून 10 हजार युआन म्हणजेच जवळपास एक लाख रुपये काढले. तीन दिवसांपूर्वी पोलिसांना हा चोर एका इमारतीमध्ये लपला असल्याची माहिती मिळाली.

काही वेळातच पोलीस, चोर लपलेल्या बिल्डिंगमध्ये पोहचले. त्यावेळी पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकून चोराने पळण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने ना इमारतीच्या पायऱ्यांचा ना लिफ्टचा वापर केला, तर बिल्डिंगच्या बाहेरील भागातून पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या प्रयत्नात तो एका खिडकीतच अडकला.

(वाचा - दिवाळीमध्ये पैशांची कमी?Paytm Postpaid वरून खरेदी करा, एक महिन्यानंतर पेमेंट करा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चोर 2003 मध्येही चोरीच्या आरोपाखाली 3 वर्षांसाठी जेलमध्ये गेला आहे. त्यानंतर पाच वर्षांनी त्याला ड्रग्स घेताना पकडण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला तीन महिन्यांसाठी पुनर्वसन केंद्रात पाठवलं होतं. त्यानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आली आणि 2017 मध्ये परत जेलमध्ये पाठवण्यात आलं होतं.

(वाचा - बाबो!तुमच्या उंचीपेक्षाही लांब आहे या तरुणीचे केस,गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद)

चौकशीदरम्यान, चोराने पोलिसांना असं सांगितलं की, जेलमधून निघाल्यानंतर त्याला आपल्या मित्रासोबत व्यवसाय सुरू करायचा होता. ज्यासाठी त्याला पैशांची गरज होती. परंतु पैसे नसल्याने, त्याने स्थानिक दुकानात चोरी केली, जेणेकरुन त्या पैशाने तो व्यवसाय सुरू करू शकेल.

(व्हिडिओ सौजन्य : Daily mail)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी चोराला पोलीस येत असल्याची माहिती मिळाली, त्यावेळी तो गिर्यारोहकाप्रमाणे बिल्डिंगवरुन उतरू लागला. सध्या त्याच्याकडील सर्व सामान जप्त केल्याचं सांगण्यात आलं आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: November 7, 2020, 3:52 PM IST

ताज्या बातम्या