बाबो! तुमच्या उंचीपेक्षाही लांब आहेत या तरुणीचे केस, गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद

बाबो! तुमच्या उंचीपेक्षाही लांब आहेत या तरुणीचे केस, गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद

निलांशी वयाच्या 6व्या वर्षापासून आपले केस वाढवत आहे. पार्लरमध्ये झालेल्या एका अनुभवामुळे तिने आपले केस कधीही न कापण्याचा निर्णय घेतला.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : 18 वर्षीय निलांशी पटेलने आपल्या नावे असलेला आधीचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढत, पुन्हा एकदा नवा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. गुजरातमध्ये राहणाऱ्या निलांशी पटेलने तिच्या केसांच्या उंचीसाठी वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. निलांशीच्या केसांची उंची 6 फूट 6 इंच इतकी आहे.

निलांशी वयाच्या 6व्या वर्षापासून आपले केस वाढवत आहे. पार्लरमध्ये झालेल्या एका अनुभवामुळे तिने आपले केस कधीही न कापण्याचा निर्णय घेतला. पार्लरमध्ये निलांशीचा हेअर कट बिघडला होता. त्यानंतर तिने केस न कापण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून म्हणजेच वयाच्या सहाव्या वर्षापासून तिने केस न कापण्याचं ठरवलं. निलांशीची आई केसांची देखभाल करण्यासाठी तिला मदत करत असल्याचं, निलांशीने सांगितलं.

(वाचा - 78व्या वर्षी 17 वर्षांच्या मुलीशी लग्न केलं खंर; पण 22 दिवसांतच...)

निलांशीचे केस ओले करून त्यांची लांबी मोजण्यात आली होती. एका फ्लॅट, प्लेन जागेवर ठेऊन केसांची लांबी मोजण्यात आली. गिनिज बुक रेकॉर्ड्सने निलांशीचा व्हिडिओही यूट्यूबवर शेअर केला आहे. त्या व्हिडिओला अनेकांच्या चांगल्या प्रतिक्रिया येत असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

यापूर्वीही सर्वात लांब केसांचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड निलांशीच्या नावे होता. नोव्हेंबर 2018 मध्ये तिने हा रेकॉर्ड केला होता.

(वाचा - स्वत:ला गायब करण्यासाठी व्यापाऱ्याची ट्रिक,शंभर पोलिसांनी 500 CCTVमधून लावला छडा

त्यावेळी इटलीच्या टीव्ही शो द नाईट ऑफ रेकॉर्ड्समध्ये ती दिसली होती. त्यावेळी निलांशीच्या केसांची लांबी 5 फूट 7 इंच इतकी होती. आता मात्र तिनेच तिचा हा रेकॉर्ड मोडीत काढत नवा रेकॉर्ड केला आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: November 7, 2020, 2:26 PM IST
Tags: woman hair

ताज्या बातम्या