मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

दिवाळीमध्ये पैशांची कमी? Paytm Postpaid वरून खरेदी करा, एक महिन्यानंतर पेमेंट करा

दिवाळीमध्ये पैशांची कमी? Paytm Postpaid वरून खरेदी करा, एक महिन्यानंतर पेमेंट करा

Paytm Postpaid सर्व्हिसचा वापर युजर, रिचार्ज, बिल पेमेंट किंवा खरेदी इत्यादीसाठी करू शकतो. विशेष बाब म्हणजे, पेटीएम पोस्टपेड युजर्स आपल्या आसपासच्या किराणा स्टोरवरूनही Buy Now Pay Later अशाप्रकारे खरेदी करू शकतात.

    नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर : देशात फेस्टिव्ह सीजनची धूम आहे. फेस्टिव्ह सीजनमध्ये मोठी खरेदीही केली जाते. अशावेळी पैसे कमी पडत असल्यास, देशातील अनेक कंपन्या बाय नाउ पे लेटर (Buy Now Pay Later)ही सुविधा देत आहेत. देशातील सर्वात मोठी ई-वॉलेट कंपनी असलेल्या पेटीएमकडूनही Buy Now Pay Later सुविधा देण्यात येत आहे. कंपनीच्या या सर्व्हिसचं नाव पेटीएम पोस्टपेड ठेवण्यात आलं आहे. पेटीएम पोस्टपेड (Paytm Postpaid) आपल्या युजर्सला 1 लाख रुपयांपर्यंतचं क्रेडिट लिमिट देत आहे. युजर्स, क्रेडिट लिमिटमध्ये खरेदी करू शकतात आणि त्याचे पैसे पुढील महिन्यात भरू शकतात. Paytm Postpaid सर्व्हिसचा वापर युजर, रिचार्ज, बिल पेमेंट किंवा खरेदी इत्यादीसाठी करू शकतो. विशेष बाब म्हणजे, पेटीएम पोस्टपेड युजर्स आपल्या आसपासच्या किराणा स्टोरवरूनही Buy Now Pay Later अशाप्रकारे खरेदी करू शकतात. 18 वर्षीय निलांशीने मोडला स्वत:चाच रेकॉर्ड; लांब केसांसाठी गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड Paytm Postpaid वेरिएंट - कंपनीने पेटीएम पोस्टपेड तीन वेरिएंटमध्ये जारी केलं आहे. Lite, Delite आणि Elite असे तीन वेरिएंट आहेत. पोस्टपेड लाईटमध्ये 20000 रुपयांपर्यंतची मर्यादा आहे. ज्यात कन्विनियंस फी मासिक बिलाचीही सुविधा आहे. पोस्टपेड डिलाईट आणि पोस्टपेड एलीटमध्ये 20000 रुपयांपासून 1 लाख रुपयांपर्यंतची मर्यादा आहे. यात कोणत्याही प्रकारची कन्विनियंस फी नाही. तुमच्या कंप्यूटरमध्ये व्हायरस आहे असं सांगत...चोरट्यांकडून तब्बल 8 कोटींची फसवणूक Paytm Postpaid कसं कराल ऍक्टिव्हेट - कंपनी हळू-हळू पेटीएम पोस्टपेड सर्व्हिसचा आपल्या ग्राहकांमध्ये विस्तार करत आहे. ग्राहक एलिजिबल असल्यास, पेटीएम पोस्टपेड सर्व्हिस ऍक्टिव्हेट करू शकतात. - पेटीएम अकाउंटमध्ये लॉगइन करा. सर्च आयकॉनवर क्लिक करून My Paytm Postpaid टाईप करा. - त्यानंतर Paytm Postpaid आयकॉनवर क्लिक करा. - त्यानंतर केवायसी (KYC) पूर्ण करा. केवायसीची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आहे. - KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पेटीएम पोस्टपेड सर्व्हिस ऍक्टिव्हेट होईल.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Paytm, Paytm offers

    पुढील बातम्या