जाहिरात
मराठी बातम्या / Viral / उंच टेकडीवर उभा आहे विमान; फोटोग्राफरने पंखावर चालत दाखवलं मनमोहक दृश्य, पुन्हा पुन्हा पाहाल हा VIDEO

उंच टेकडीवर उभा आहे विमान; फोटोग्राफरने पंखावर चालत दाखवलं मनमोहक दृश्य, पुन्हा पुन्हा पाहाल हा VIDEO

उंच टेकडीवर उभा आहे विमान; फोटोग्राफरने पंखावर चालत दाखवलं मनमोहक दृश्य, पुन्हा पुन्हा पाहाल हा VIDEO

हे विमान समुद्र किनाऱ्यावर असलेल्या डोंगरावर मोठ्या उंचीवर ठेवण्यात आलं आहे. ज्यावरुन समुद्राचं अतिशय सुंदर दृश्य पाहायला मिळतं. सध्या याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 31 मे : आजकाल अनेक देशांमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी लोक विविध प्रकारचे जुगाड करताना आणि नवीन पर्यटन स्थळं निर्माण करताना दिसतात. या सगळ्यात इंडोनेशियातील बाली या सुंदर बेटावर समुद्राजवळ एका व्यक्तीने विमानाची रचना तयार करून नवी ओळख निर्माण केली आहे. जी पाहण्यासाठी दररोज पर्यटकांची मोठी गर्दी जमते (Retired Plane near Beach). VIDEO: व्यक्तीने कॅमेऱ्यासमोर खाल्ल्या जगातील सर्वात तिखट मिरच्या; अवस्था पाहूनच अंगावर येईल काटा हे विमान समुद्र किनाऱ्यावर असलेल्या डोंगरावर मोठ्या उंचीवर ठेवण्यात आलं आहे. ज्यावरुन समुद्राचं अतिशय सुंदर दृश्य पाहायला मिळतं. सध्या याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बालीचा फोटोग्राफर एका उंच टेकडीवर असलेल्या या विमानाच्या पंखावर चालताना दिसतो. सध्या हे विमान रिटायर्ड झालं आहे.

जाहिरात

अर्थपिक्सने हा व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या छोट्या क्लिपमध्ये फोटोग्राफर कोमिंग दरमावन एका टेकडीवर असलेल्या रिटायर्ड विमानाच्या पंखांवर चालताना दिसतो. उलुवातु बडुंग रिजन्सीमधील न्यांग-न्यांग बीचजवळ विमानाचं निवासस्थानात रूपांतर करण्यात आलं आहे, असं पोस्टच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आलं आहे. OMG! हे कसं शक्य आहे? महिलेचा चमत्कारिक Pregnancy Video पाहून चक्रावले नेटिझन्स त्यानंतर कॅमेरा हळूहळू हिरवेगार खडक आणि समुद्र किनाऱ्याच्या भव्य दृश्याकडे सरकतो. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याला बातमी लिहिपर्यंत सुमारे 6 लाख लाइक्ससह 12 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतेक युजर्स हे विमान जवळून पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात