जाहिरात
मराठी बातम्या / Viral / OMG! हे कसं शक्य आहे? महिलेचा चमत्कारिक Pregnancy Video पाहून चक्रावले नेटिझन्स

OMG! हे कसं शक्य आहे? महिलेचा चमत्कारिक Pregnancy Video पाहून चक्रावले नेटिझन्स

OMG! हे कसं शक्य आहे? महिलेचा चमत्कारिक Pregnancy Video पाहून चक्रावले नेटिझन्स

9 महिन्यांची प्रेग्नंट असलेल्या या महिलेने आपला असा व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 मे : सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ फनी, कही इमोशनल, काही शॉकिंग असतात. अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा एका प्रेग्नंट महिलेचा व्हिडीओ आहे. महिलेने आपल्या प्रेग्नन्सीचा चमत्कारिक असा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो पाहून नेटिझन्स चक्रावले आहेत (Magical pregnancy video). सोशल मीडियावर प्रेग्नन्सीची माहिती देणारे किंवा प्रेग्नशीसंबंधित काही व्हिडीओ असतात. प्रेग्नंट महिलाही आपला अनुभव शेअर करतात. या महिलेनेही आपला प्रेग्न्सन्सीचा व्हिडीओ पोस्ट केला. जोरन अर्सिला असं या महिलेचं नाव आहे. तिने आपण 9 महिन्यांची प्रेग्नंट असल्याचं सांगितलं आहे. पण आश्चर्य म्हणजे ही महिला प्रेग्नंट आहे असं बिलकुल दिसत नाही. 9 महिन्यांची प्रेग्नंट म्हणजे बेबी बम्प दिसतं. पण व्हिडीओत पाहू शकता ब्लॅक टाइट् शॉर्ट्स आणि व्हाइट फिट टॉप  घातलेली ही महिला कॅमेऱ्यासमोर चालत येते. तिचं पोट अगदी सपाट वाटतं. यापेक्षा मोठा धक्का तर तुम्हाला पुढे बसेल. हे वाचा -  PHOTO - डिस्काऊंटच्या नादात दातांवर उपचारासाठी परदेशात गेली; तोंड उघडताच हादरली महिला ही महिला काही क्षणात एका बाजूला वळते, तेव्हा चक्क तिचं बेबी बम्प दिसतं. सुरुवातीला अगदी फ्लॅट टमी असलेल्या या महिलेचं बेबी बम्प अचानक दिसतं. हा व्हिडीओ म्हणजे एखादा मॅजिकल व्हिडीओच वाटतो आहे.

जाहिरात

जोरन एक फिटनेस इन्स्ट्रक्टर आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर ती बरेच व्हिडीओ पोस्ट करत असते. या व्हिडीओतही तिचा फिटनेस दिसून येतो. तिच्या फिटनेसचं सर्वांनी कौतुक केलं आहे. बेबी बम्पशिवाय प्रेग्नन्सी तसा हा व्हिडीओ म्हणजे एक ऑप्टिकल इल्युझन आहे म्हणजे दृष्टीभ्रम. ज्यात दिसतं तसं नसतं किंवा जे असूनही प्रत्यक्षात दिसत नाही. पण अशी काही प्रकरण आहेत. ज्यात खरंच बेबी बम्प न दिसता महिला प्रेग्नंट झाल्या आहेत. म्हणजे या महिलांनाही आपल्या प्रेग्नन्सीबाबत माहिती नव्हती आणि अचानक त्यांनी आपल्या बाळांना जन्म दिला आहे.   डेली मेल च्या रिपोर्टनुसार याला क्रिप्टीक प्रेग्नन्सी (cryptic pregnancy) किंवा प्रेग्नन्सी डिनाइल (pregnancy denial)  म्हणतात. हे वाचा -  काहीही! 2 तरुणींचा कॅमेऱ्यासमोर रंगला भलताच खेळ; VIDEO पाहून हैराण व्हाल तरुण महिला ज्या कधी प्रेग्नंट झाल्या नाहीत किंवा अशा महिला ज्यांना आपली रजोनिवृत्ती जवळ आली असं वाटतं किंवा ज्या गर्भनिरोधक वापरत नाही अशा महिलांमध्ये अशी प्रेग्नन्सी दिसून येते. पण एखाद दिवशी गोळी घणं राहिलं किंवा डायरिया असेल तर अशी प्रेग्न्सी होऊ शकते. अनियंत्रित मासिक पाळी असलेल्या महिलांनादेखील त्या प्रेग्नंट आहेत, अशी लक्षणं दिसून येत नाहीत. ज्यांना पीसीओएसची समस्या आहे आणि ज्यांच्यामध्ये हार्मोन्स अनियंत्रित आहेत. अशा महिलांमध्येसुद्धा अशी प्रेग्नन्सी होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात