मराठी बातम्या /बातम्या /Viral /तुमची मुलंही एकटी बाथरूममध्ये जातात? चिमुकल्यासोबत घडलेली घटना वाचून उडेल थरकाप

तुमची मुलंही एकटी बाथरूममध्ये जातात? चिमुकल्यासोबत घडलेली घटना वाचून उडेल थरकाप

एका खेळकर मुलाची म्हणजेच एडवर्डची स्टोरी स्वतः पोलिसांनी ट्विटवरुन शेअर केली आहे. या मुलाने आपल्या डोकंच टॉयलेट सीटमध्ये घातलं आणि ते तिथेच अडकलं (Toddler Stuck In Toilet).

एका खेळकर मुलाची म्हणजेच एडवर्डची स्टोरी स्वतः पोलिसांनी ट्विटवरुन शेअर केली आहे. या मुलाने आपल्या डोकंच टॉयलेट सीटमध्ये घातलं आणि ते तिथेच अडकलं (Toddler Stuck In Toilet).

एका खेळकर मुलाची म्हणजेच एडवर्डची स्टोरी स्वतः पोलिसांनी ट्विटवरुन शेअर केली आहे. या मुलाने आपल्या डोकंच टॉयलेट सीटमध्ये घातलं आणि ते तिथेच अडकलं (Toddler Stuck In Toilet).

नवी दिल्ली 22 जानेवारी : आपल्या मुलांची योग्य काळजी घेणं, हे जगातील सर्वात अवघड कामांमधील एक आहे. विशेषतः जर मुलं खूप लहान असतील तर त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवावी लागते. कारण त्यांना हे माहिती नसतं, की आपलं कोणतं कृत्य आपल्याला संकटात आणू शकतं. मुलं फक्त मस्ती करत राहतात. मग यात त्यांना दुखापतही होते आणि अनेकदा ते मोठ्या अडचणीतही सापडतात. अशा एका खेळकर मुलाची म्हणजेच एडवर्डची स्टोरी स्वतः पोलिसांनी ट्विटवरुन शेअर केली आहे. या मुलाने आपल्या डोकंच टॉयलेट सीटमध्ये घातलं आणि ते तिथेच अडकलं (Toddler Stuck In Toilet).

ऑनलाईन डेटिंग तरुणाला पडलं महागात; महिलेनं 8 लाख रुपये लुटले, अन् मग...

इंग्लंडच्या डरहम येथे राहणाऱ्या या मुलाने खेळता-खेळता आपलं डोकं टॉयलेट सीटच्या आतमध्ये घातलं (Head Stuck in Toilet Seat). डोकं आतमध्ये अडकल्याने तो जोरजोरात रडू लागला. मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून बाहेर असलेली त्याची आईही घाबरली. सुरुवातीला तिने आपल्या मुलाचं डोकं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र यात यश न आल्याने तिने पोलिसांना फोन केला. यानंतर काही वेळातच रेस्क्यू टीम महिलेच्या घरी आली आणि बऱ्याच वेळच्या प्रयत्नानंतर मुलाचं डोकं बाहेर काढण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच लगेचच एमरजन्सी सर्व्हिसला याची माहिती देण्यात आली. यानंतर द काउंटी डरहम अॅण्ड डार्लिंगटन फायर अॅण्ड रेस्क्यू सर्व्हिस मुलाच्या घरी पोहोचली. बराच वेळ या मुलाचं डोकं बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला गेला. आतापर्यंत हे समजू शकलं नाही की या मुलाने टॉयलेट कवरमध्ये आपलं डोकं कसं अडकवून घेतलं.

तुरुंगात बसून झाला बाप; चिप्सच्या पॅकेटमध्ये पाठवायचा स्पर्म,दहशतवाद्याचा खुलासा

रेस्क्यू टीमने क्यूट एडवर्डचा फोटो शेअर करत ही बातमी ट्विट केली आहे. य़ानंतर लोकांनी रेस्क्यू टीमचं कौतुक केलं आहे. टीमने अतिशय प्रेमाने आणि मुलाला न घाबरवता त्याचं डोकं बाहेर काढलं. यासाठी लोकांनी रेस्क्यू टीमवर कौतुकाचा वर्षाव केला. तर अनेकांनी एडवर्डच्या आईला इथून पुढे त्याच्यावर जास्त लक्ष देण्याचा सल्ला दिला.

First published:
top videos

    Tags: Rescue operation, Shocking news