बुलडाणा, 25 एप्रिल : बुलडाण्याच्या अलमपूर गावात दोन ते चार वेळेस मुलीला पाहण्याचा कार्यक्रम झाला. पाचव्यांदा पाहिल्यानंतर मुलीमध्ये खोट काढणाऱ्या मुलास मुलीकडच्या मंडळींनी मनसोक्त धुलाई करत खोड मोडली आहे. तरुणाला घराबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये जाईपर्यंत रागावलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी लाथा-बुक्क्यांचा पाहुणचार घेतला. नांदुरा तालुक्यातील अलमपूर येथील मुलीच्या लग्नासाठी अकोला जिल्ह्यातील खापरखेड येथील मुलाकडील मंडळींनी तब्बल 4 ते 5 वेळा मुलीच्या पाहणीचा कार्यक्रम केला इतक्या वेळा पाहून देखील मुलाने मुलीत काही खोट काढली. पाचवेळा मुलगा मुलीला पाहण्यासाठी आला. साखरपुडा झाल्यानंतर मात्र मुलीमध्ये खोट काढणाऱ्या तरुणाची चांगलीच धुलाई करण्यात आली.
नांदुरा तालुक्यातील अलमपूर येथील मुलीच्या लग्नासाठी अकोला जिल्ह्यातील खापरखेड येथील मुलाकडील मंडळींनी तब्बल 4 ते 5 वेळा मुलीच्या पाहणीचा कार्यक्रम केला इतक्या वेळा पाहून देखील मुलाने मुलीत काही खोट काढली.
साखरपुडा झाल्यानंतर मात्र मुलीमध्ये खोट काढणाऱ्या तरुणाची चांगलीच धुलाई करण्यात आली. या प्रकाराला चिडलेल्या मुलीकडील मंडळींनी पुन्हा पाहणीसाठी आलेल्या या मुलाची यथेच्छ धुलाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अकोल्या जिल्ह्यातील तेलहरा तालुक्याच्या खापरखेडामध्ये राहणारा तरुणाने बुलडाणा जिल्ह्यातील नंदुरा तालुक्यातील आलमपुरा गावात मुलगी एक-दोन नाही तर किमान पाच वेळा पाहण्याचा कार्यक्रम केला.
हे ही वाचा- मयूर शेळकेप्रमाणेच 'या' महिलेचाही VIDEO व्हायरल, पाहा कसा वाचवला वृद्धाचा जीव
या मारहाणीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून मुलीच्या घरच्यांना कारण नसताना वेठीस धरणाऱ्या अशा प्रवृत्तीच्या लोकांत चांगलीच धडकी भरली आहे. या घटनेत तर मुलीच्या कुटुंबीयांनी मात्र नेहमी मुलांच्या मंडळींचं स्वागतच केलं. साखरपुडा झाल्यानंतर मुलगा पुन्हा मुलीला पाहण्यासाठी गेला आणि शेवटी मुलीच्या डोळ्यात दोष असल्याचं सांगून नकार दिला. नेमक्या लग्नाच्या मुहूर्तावेळी नवऱ्या मुलाने हा गोंधळ घातला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Buldhana news, Maharashtra, Marriage, Video viral, Vidharbha