मयूर शेळकेप्रमाणेच 'या' महिलेचाही VIDEO होतोय व्हायरल, पाहा कसा वाचवला वृद्धाचा जीव

मयूर शेळकेप्रमाणेच 'या' महिलेचाही VIDEO होतोय व्हायरल, पाहा कसा वाचवला वृद्धाचा जीव

सुपर मार्केटमध्ये (Supermarket) व्हिलचेअरवर बसलेले आजोबा एस्केलेटरवरून (Escalator) खाली येत असतात. मात्र, ते आजोबा व्हिलचेअरसह (Wheelchair) खाली घसरतात आणि पडणार असतात, इतक्यात एक महिला धावत जाऊन त्यांना वाचवते.

  • Share this:

नवी दिल्ली 23 एप्रिल : एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral on Social Media) होत आहे. यामध्ये असं दिसतं, की सुपर मार्केटमध्ये व्हिलचेअरवर बसलेले आजोबा एस्केलेटरवरून (escalator) खाली येत असतात. मात्र, ते आजोबा व्हिलचेअरसह खाली घसरतात आणि पडणार असतात, इतक्यात एक महिला धावत जाऊन त्यांना वाचवते. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत आजोबा एस्केलेटरवरून खाली येताना घसरतात, असं दिसतंय. तेवढ्यात काऊंटरवर उभ्या असलेल्या एका महिलेचं लक्ष तिकडे जातं आणि ती धावत जाऊन त्यांची व्हिलचेअर पकडते. निळ्या जॅकेटमध्ये दिसणाऱ्या या महिलेनं व्हिलचेअर पकडल्यानं ती थांबते आणि ते आजोबा पडण्यापासून वाचतात. तिच्यासोबत लाल जॅकेटमधील एक महिलाही धावत जाताना दिसत आहे.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने टाकलेल्या व्हिडिओनुसार, त्या व्हिलचेअरवरील माणसाचा ओरडण्याचा आवाज ऐकून ही महिला धावत जाते. एस्केलेटरवरून ती व्हिलचेअर खाली येत असताना एका लहान मुलाला धक्काही बसला आणि तो जखमी झाला आहे. व्हिलचेअर थांबवल्यानंतर काही जणांनी खाली पडलेल्या मुलाला उचलले. घटनेत वृद्ध माणसाला दुखापत झाली नसून ते ठिक आहेत. मात्र, लहान मुलाला थोडं लागलं असून तो जखमी झाला आहे. मी व्हिलचेअर खाली घसरत येताना बघून धावले, मला लागेल की नाही याची मला पर्वा नव्हती, मला फक्त त्यांना वाचवायचं होतं,’ असं त्या महिलेने एका न्यूज वेबसाईटशी बोलताना सांगितले.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून नेटकऱ्यांनी त्या महिलेवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी लाईक्स, शेअर आणि कॉमेंट्सही केल्या आहेत. हा व्हिडिओ शेअर करत एक युझर म्हणतो, ‘या महिलेने ज्याप्रकारे प्रसंगावधान राखत त्या माणसाचा जीव वाचवला ते कौतुकास्पद आहे. तिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावत जाऊन व्हिलचेअर पकडली.’ एक युझर म्हणतो, की ती ‘रीयल हिरो’ आहे. काहींनी तिला ‘बोधीसत्व’ म्हटलं आहे. एक युझर म्हणतोय, की ‘ती महिला खूप शूर आहे, तिच्यामुळे त्या माणसाचा जीव वाचला.’ तर, एक युझर म्हणतो, की ‘या घटनेमुळे सिद्ध झालं की सगळेच सुपरहिरो कॅप (टोपी) घालत नाहीत. बऱ्याचदा ते आपल्यात वावरणारे आपल्यापैकीच एक असतात.’ नेटकऱ्यांनी या व्हिडिओतील महिलेला भरभरून प्रेम दिलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबईत अंध मातेसह रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या चिमुकल्याला पॉईंटमॅन मयूर शेळकेने वाचवल्याचा व्हिडिओही प्रचंड व्हायरल झाला होता.

Published by: Kiran Pharate
First published: April 23, 2021, 3:15 PM IST

ताज्या बातम्या